PICS : कालिन भैय्याच्या ‘मिर्झापूर 2’मध्ये झळकणार ही सुंदर बाला, फोटो पाहून व्हाल खल्लास

By रूपाली मुधोळकर | Published: October 23, 2020 08:00 AM2020-10-23T08:00:00+5:302020-10-23T11:15:57+5:30

चर्चा अमिकाची...

‘मिर्झापूर’चा या वेवसीरिजचा पहिला सीझन सुपरडुपर हिट झाला. आता या सीरिजचा दुसरा सीझन ‘मिर्झापूर 2’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. साहजिकच ‘मिर्झापूर 2’ची संपूर्ण स्टारकास्ट जाम चर्चेत आहे. यातलेच एक नाव म्हणजे, अभिनेत्री अमिका शैल.

‘मिर्झापूर 2’मध्ये अमिकाची वर्णी लागली आहे. यात ती एका गायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘मिर्झापूर 2’मध्ये काम करण्याची संधी मिळणे अमिकासाठी स्वप्नपूर्तीपेक्षा कमी नव्हते. त्यामुळे रोल मिळाल्याचा फोन आल्यावर तिला अश्रू आवरता आले नाहीत.

‘मिर्झापूर’ ही सीरिज लोकांनी डोक्यावर घेतली होती. मी सुद्धा या सीरिजची चाहती होती. अशात या सीरिजच्या दुस-या भागात मला काम मिळाल्याचे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू होते. माझे एक स्वप्न पूर्ण झाले होते. हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही, असे अमिका म्हणाली.

‘मिर्झापूर 2’मध्ये कालिन भैय्या अर्थात पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही तिने शेअर केला. त्यांच्याबद्दल काय बोलू. ते इतका सहज,सुंदर अभिनय करतात की, त्यांच्या प्रेमात पडायला होतं, असे अमिका म्हणाली.

अमिका शैल ही अभिनेत्री आहे. शिवाय ख-या आयुष्यात गायिकाही आहे. वयाच्या नवव्या वर्षी ‘लिटील चँप्स’ या सिंगीग रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

यानंतर काही वर्षांनी तिने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले. मॅडम सर, लाल इश्क, अभय, उडान अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली.

बालवीर रिटर्न्स या मालिकेत तिने वायुपरीची भूमिका साकारून दाद मिळवली.

अमिका लवकरच बॉलिवूडमध्येही डेब्यू करतेय. अक्षय कुमारच्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.

अलीकडे ‘गंदी बात 5’ या वेबसीरिजमध्येही ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.

अमिका सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. शिवाय फिटनेस फ्रिक आहे. वर्कआऊट करतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ ती शेअर करत असते.