IN PICS : तुझ्या चित्रपटांमुळेच महिलांवर अत्याचार होतात....! युजरने डिवचले; मल्लिका शेरावतने सुनावले

By रूपाली मुधोळकर | Published: October 8, 2020 04:24 PM2020-10-08T16:24:44+5:302020-10-08T16:32:17+5:30

भारतीय महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या मुद्यावरून एका युजरने मल्लिकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मग काय? मल्लिकाने या युजरला सणसणीत उत्तर दिले.

मल्लिका शेरावत सध्या भलेही चित्रपटांपासून लांब आहे. पण सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच सक्रिय आहे. या ना त्या कारणाने ती सतत चर्चेत असते. सध्या एका वेगळ्या कारणाने ती चर्चेत आहे.

होय, भारतीय महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या मुद्यावरून एका युजरने मल्लिकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मग काय? मल्लिकाने या युजरला सणसणीत उत्तर दिले.

तर त्याचे झाले असे की, बॉलिवूडच्या अन्य सेलिब्रिटींप्रमाणे मल्लिकानेही हाथरस बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया देत एक ट्विट केले. भारताच्या महिलांकडे बघण्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही, असे ट्विट तिने केले होते. तिच्या याच ट्विटवर कमेंट करताना एका युजरने मल्लिकाला डिवचले.

‘तुझ्या चित्रपटांमधून तू जो संदेश पोहोचवतेस तो सुद्धा अशा घटनांसाठी कारणीभूत असतो असे तुला वाटत नाही का? दुसºयांना उपदेश देण्याआधी स्वत:ला सुधारावे,’ असे या युजरने मल्लिकाला डिवचताना लिहिले.

या युजरला मल्लिकाने सणसणीत उत्तर दिले. ‘म्हणजे ज्या चित्रपटांमध्ये मी काम करते, ते बलात्कारांना आमंत्रण देतात. ही तुमच्यासारखी मानसिकताच भारतीय समाजाला महिलांविरोधी बनवतेय. जर तुम्हाला माझ्या चित्रपटांबद्दल समस्या असेल तर ते पाहू नका,’ असे मल्लिकाने लिहिले.

मल्लिका शेरावत ही बॉलिवूड बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

करीना कपूर-तुषार कपूर यांच्या ‘जीना सिर्फ मेरे लिए’ चित्रपटातून मल्लिकाने बॉलिवूड पदार्पण केले.

‘जीना सिर्फ मेरे लिए’ नंतर ‘ख्वाहिश’ हा चित्रपट तिला मिळाला. या चित्रपटातील तिने दिलेल्या किसींग सीनची प्रचंड चर्चा झाली.

मल्लिकाला खरी ओळख दिली ती २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने. या चित्रपटात इमरान हाश्मी सोबतच्या बोल्ड दृश्यांची बरीच चर्चा झाली. हा चित्रपट हिटही झाला. आजही मल्लिकाला ‘मर्डर गर्ल’ म्हणून ओळखले जाते.

बॉलिवूडमधून ब्लॅकलिस्ट केल्या जाण्याच्या भीतीने मल्लिकाने एक ऑफर नाकारली होती. होय, ‘प्ले बॉय’ या जगप्रसिद्ध मॅगझिनने मल्लिकाला कव्हर पेजवर न्यूड पोज देण्याची आॅफरदिली होती. ही ऑफर मिळालेली मल्लिका पहिली भारतीय अभिनेत्री होती. पण मल्लिकाने ही ऑफर नाकारली. न्यूड पोज दिल्यास आपल्याला बॉलिवूडमधून ब्लॅकलिस्ट केले जाईल, अशी भीती तिला होती.