शूटींग करता करता प्रेमात पडले हे साऊथ स्टार्स...! काहींना थाटला संसार, काहींचे अधुरे राहिले प्रेम

By रूपाली मुधोळकर | Published: October 18, 2020 03:56 PM2020-10-18T15:56:15+5:302020-10-18T16:03:27+5:30

पडद्यावर एकमेकांसोबत प्रेमाचा अभिनय करता करता कलाकार ख-या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडतात. या यादीत साऊथच्याही अनेक कलाकारांची नावे आहेत. यापैकी अनेकांनी संसार थाटला तर काहींचे प्रेम बोहल्यावर चढण्याआधीच संपले.

साऊथ स्टार नागार्जुन विवाहित असताना आमलाच्या प्रेमात पडला. आमलासाठी नागार्जुनने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. नंतर अमला व नागार्जुनचे लग्न झाले.

तामिळचा सुपरस्टार अजित कुमार ‘अमार कलम’च्या शूटींगदरम्यान त्याची को-स्टार शालिनीच्या प्रेमात पडला. यानंतर वर्षभरातच दोघांनी लग्न केले.

अभिनेते प्रकाश राज पोनी वर्मा या कोरिओग्राफरसोबत काम करता करता तिच्या प्रेमात पडले. यानंतर त्यांनी पोनी वर्मासोबत लग्नही केले.

तामिळ सुपरस्टार सूर्या व ज्योतिका यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केले. यादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 2006 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.

महेश बाबू व नम्रता शिरोडकर टॉलिवूडचे सर्वात क्यूट कपल आहे. ‘वामसी’ या सिनेमात काम करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे दोघांनी लग्नही केले.

‘केजीएफ’ फेम यश शूटींगदरम्यान त्याची को-स्टार राधिका पंडितच्या प्रेमात पडला. टीव्ही सीरिअल्सपासून दोघांनी करिअरला सुरुवात केली होती. नंतर दोघांनीही लग्न केले.

नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य व अभिनेत्री सामंथा अक्किनेनी ‘माया चेसवा’ या सिनेमाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघेही लग्नबेडीत अडकले.

नयनतारा व प्रभुदेवा हेही शूटींग करता करता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र यांचे प्रेम अधुरे राहिले. कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले.

कधीकाळी प्रभुदेवाच्या प्रेमात असलेली नयनतारा सध्या विग्नेश शिवनच्या प्रेमात वेडी झाली आहे. नानुम राऊडी या सिनेमाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. लवकरच हे कपल लग्न करणार आहे.