नोकरी सोडून अभिनयात आला; हर्षद मेहताच्या भूमिकेने स्टार झाला...! जाणून घ्या प्रतिक गांधीबद्दल खास गोष्टी

By रूपाली मुधोळकर | Published: October 20, 2020 01:51 PM2020-10-20T13:51:33+5:302020-10-20T14:04:11+5:30

Scam 1992 : प्रतिक गांधी आहे तरी कोण?

सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आणि एक चेहरा अचानक लोकांच्या डोळ्यांत भरला. तो म्हणजे, हर्षद मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता प्रतिक गांधी याचा.

देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणा-या आणि सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा करणा-या हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित ‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमध्ये प्रतिक गांधीने मुख्य भूमिका साकारली आहे.

हर्षद मेहताची भूमिका प्रतिकने अशी काही लिलया साकारली की सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्याचा दमदार अभिनय पाहून चाहते त्याच्या प्रेमात पडले आहेत.

गुजराती रंगभूमी गाजवणा-या प्रतिकने 2014 साली ‘बे यार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

प्रतिकने 2004 मध्ये गुजराती नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘युअर्स इमोशनली’ या इंग्रजी चित्रपटातही तो झळकला.

मोहन नो मसालो, हू चंद्रकांत बक्षी यांसारख्या नाटकांमध्ये प्रतिकने साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.

मूळचा सूरता असलेला प्रतिक इंजिनिअर आहे. पुढे सेल्सपर्सन म्हणूनही त्याने काम सुरु केले आणि सोबत सोबत नाटक, लाईव्ह शो करू लागला.

इंजिनिअर झालेल्या आपल्या मुलाने मोठ्या पगाराची नोकरी करावी, अशी खरे तर प्रतिकच्या कुटुंबाची इच्छा होती. पण प्रतिकने एकदिवस मी अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करणार, असे घरच्यांना स्पष्ट सांगितले.

केवळ सांगितले नाही तर 2016 मध्ये इंजिनीअरिंगची नोकरी सोडून तो पूर्णवेळ अ‍ॅक्टिंग करू लागला.

राँग साइड राजू, व्हेंटिलेटर, मित्रों , लवयात्री या चित्रपटांमध्ये त्याला भूमिका मिळाल्या आणि या प्रत्येक संधीचे त्याने सोने केले.

याचदरम्यान हंसल मेहता यांनी ‘स्कॅम 1992’साठी त्याला विचारले आणि प्रतिकने लगेच या वेबसीरिजसाठी होकार दिला. या वेबसीरिजने प्रतिक अचानक लोकांच्या नजरेत भरला.