लोक हे पुस्तक वाचून रडतात आणि तू हसतेय...! डेजी शाह फोटो शेअर करून फसली, म्हणाली सॉरी

By रूपाली मुधोळकर | Published: October 1, 2020 02:37 PM2020-10-01T14:37:35+5:302020-10-01T14:58:01+5:30

हातात पुस्तक आणि चेह-यावर हसू असा तिचा फोटो पाहून नेटक-यांनी तिला नको ते सुनावले. अखेर डेजीला माफी मागावी लागली.

अभिनेत्री डेजी शाह हिला अखेर लोकांची माफी मागावी लागली. कारण काय तर तिचा एक फोटो. होय, हा फोटो पाहिल्यानंतर नेटकºयांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

तर आता या फोटोची भानगड नेमकी काय, ते जाणून घेऊ. तर डेजीने एक पुस्तक वाचत असतानाचा फोटो शेअर केला. हातात पुस्तक आणि चेहºयावर हसू असा तिचा फोटो पाहून नेटकºयांनी तिला नको ते सुनावले. अखेर डेजीला माफी मागावी लागली.

‘फक्त एक हास्य...,’ असे कॅप्शन हा फोटो शेअर डेजीने करताना दिले. या फोटोत डेजी खालेद हुसैन यांचे ‘अ थाऊजेंड स्पेन्डिड सन्स’ हे पुस्तक वाचताना दिसतेय. नेमके हे पुस्तक वाचताना हसणे डेजीला भारी पडले.

लोकांनी तिला बºयाच गोष्टी सुनावले. हे पुस्तक वाचताना तू हसूच कशी शकतेस? हे जगातील सर्वात शोकांत कादंबरी आहे. हे पुस्तक वाचणारा अंतर्बाह्य हादरतो आणि तो हसतेस, अशा शब्दांत लोकांनी डेजीचा क्लास घेणे सुरु केले.

मी हे पुस्तक वाचलेय. या पुस्तकाचा विचार मनात येताच मी दु:खी होता. माझ्यामते, हे पुस्तक वाचल्यानंतर हसू येईल, असा जगाच्या पाठीवर एकही जण नसेल, असे एका युजरने तिला सुनावले.

अशाप्रकारे ट्रोल झाल्यानंतर डेजीने यावर स्पष्टीकरण दिले. शिवाय सरतेशेवटी माफीही मागितली.

तुम्ही मला ओळखत नाही. मी वाचक आहे की पुस्तक प्रॉप म्हणून वापरले, हेही तुम्हाला ठाऊक नाही. कदाचित मी दुसºया एखाद्या गोष्टीवर हसले असेन आणि तुम्ही उगाच नाही नाही त्या कथा रचल्या. मी शेवटी इतकेच म्हणेल की, जियो और जीने दो, असे डेजीने लिहिले.

यानंतर मात्र तिने माफीही मागितली. मी ते पुस्तक वाचून हसत नव्हतेच. माझा एक मित्र कॅमे-यामागून जे काही बोलला त्यावर मी हसले. हा एक कँडिड फोटो होता आणि म्हणून तो मी पोस्ट केला होता. त्यावेळी मी केवळ पुस्तकाची चार-पाच पानं वाचली होती. हे पुस्तकात कोणती शोकांतिका आहे, हे मला माहित नव्हते. तरीही माफ करा, असे तिने लिहिले. ‘अ थाऊजंड स्पेन्डिड सन्स’ ही मरियम या मुलाची दु:खान्तिका लिहिली आहे.

डेजीने 2011 मध्ये कन्नडमधील ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.

2003 मध्ये आलेल्या सलमानच्या ‘जय हो’ चित्रपटातही डेजी शाह झळकली होती. ‘जय हो’नंतर ‘हेट स्टोरी-३’मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली.

Read in English