बॉलिवूडला कोरोनाचा विळखा, या सेलिब्रेटींना आतापर्यंत झालीय कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 PM2021-03-24T16:33:35+5:302021-03-24T16:55:55+5:30

आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने घरीच स्वतःला क्वारंटाइन केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने त्याच्या स्टाफलादेखील कोरोनाची टेस्ट करायला सांगितली आहे.

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कार्तिक आर्यन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते.

मनोज वाजपेयीला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्याला त्याचा आनंद अद्याप सेलिब्रेट करता आलेला नाहीये. कारण त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याने स्वतःला क्वारंटाईन केले होते.

संजय लीला भन्साळी 'गंगूबाई काठियावाडी'च्या शूटिंगमध्ये बिझी होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले होते.

सतिश कौशिक यांना कोरोना झाला असून ते सध्या रुग्णालयात दाखल आहेत.

सिद्धांतने इन्स्टास्टोरीवर याची माहिती दिली होती. ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. प्रकृती ठीक आहे. घरीच क्वारंटाईन आहे. तब्येतीची काळजी घेतोय आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करतोय,’ असे सिद्धांतने म्हटले होते.

तारा सुतारियाला कोरोनाची लागण झाली होती. तिने त्याआधीच काही दिवसांपूर्वी तडप चित्रपटाचे शूटिंग संपविले होते.

अमिताभ यांच्यानंतर अभिषेकला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याला देखील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोना झाल्यानंतर घरातील सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ऐश्वर्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.