मिनाक्षी शेषाद्रीसाठी वेडा होता हा सिंगर, पाहा ‘दामिनी’चे कधीही न पाहिलेले फोटो

By रूपाली मुधोळकर | Published: November 16, 2020 04:09 PM2020-11-16T16:09:28+5:302020-11-16T16:16:26+5:30

90 च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आज 57 वर्षांची झाली. आज तिचा वाढदिवस.

90 च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आज 57 वर्षांची झाली. आज तिचा वाढदिवस.

16 नोव्हेंबर झारखंडच्या सिंदरी येथे जन्मलेल्या मिनाक्षीचे खरे नाव शशीकला आहे.

दामिनी, हिरो, घातक असे सुपरहिट सिनेमे देणा-या मिनाक्षीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.

त्या काळातील आघाडीची अभिनेत्री म्हणून मिनाक्षी ओळखली जाऊ लागली. पण नाव, प्रसिद्धी, पैसा असे सगळे काही असताना मिनाक्षीने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. केवळ बॉलिवूडच नाही तर देश सोडून ती परदेशात स्थायिक झाली.

1995 मध्ये मिनाक्षीने अमेरिकेत राहणारा इनव्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केले. विशेष म्हणजे, लग्नाची बातमी तिने बराच काळ दडवून ठेवली.

लग्नानंतरही ती चित्रपटात काम करत राहिली. पण अखेर मिनाक्षीच्या लग्नाचा खुलासा झाला आणि यानंतर मिनाक्षीने अचानक बॉलिवूड सोडून पतीसोबत परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती कधीही चित्रपटात दिसली नाही.

याच मिनाक्षीचे एका गायकासोबतच्या अफेअरची त्याकाळी प्रचंड चर्चा रंगली होती. हा गायक कोण तर कुमार सानू.

कुमार सानू आणि मिनाक्षीचे अनेक वर्षं अफेअर होते. कुमार सानूची पहिली पत्नी रिटाने त्यांच्या घटस्फोटासाठी मिनाक्षीला जबाबदार धरले होते.

1994 ला प्रकाशित झालेल्या फिल्मफेअर मासिकानुसार कुमारची पत्नी रिटाने घटस्फोटाची केस दाखल करताना मिनाक्षी त्यांच्या घटस्फोटासाठी कारणीभूत असल्याचे घटस्फोटाच्या कारणामध्ये लिहिले होते. फिल्मफेअरमध्ये ही बातमी आल्यानंतर या बातमीची चांगलीच चर्चा झाली होती. पण मिनाक्षीने यावर मौन राखणेच पसंत केले होते.

घटस्फोटाबद्दल रिटाने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, मी गरोदर असताना कुमार सगळे पैसे मिनाक्षीवर उघळत होता. त्यावेळी माझ्याकडे एक रुपयादेखील नसायचा. मिनाक्षी आणि कुमार यांच्याविषयी सुरुवातीला मला कळल्यावर मिनाक्षीसारखी सुसंस्कृत मुलगी असे करू शकेल यावर माझा विश्वासच बनला नव्हता. पण नंतर मला सगळ्या गोष्टी हळूहळू करून कळायला लागल्या.

मिनाक्षी आणि कुमारमध्ये देखील काही काळानंतर दुरावा निर्माण झाला आणि कुमार सानूने बिकानेरमध्ये राहाणाºया सलोनीसोबत दुसरे लग्न केले.

गेल्या काही वर्षांत मिनाक्षी कमालीची बदलली आहे. इतकी की, तिला ओळखणेही कठीण आहे. मिनाक्षीला एक मुलगा व एक मुलगी आहे.