जॉर्जिया अँड्रियानीने अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी केले आहे मॉडलिंग, जाणून घ्या तिच्याविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 06:00 AM2021-04-12T06:00:00+5:302021-04-12T06:00:02+5:30

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि बर्‍याचदा तिचे बोल्ड व्हिडिओ आणि फोटोही शेअर करते.

जॉर्जिया अरबाज खानमुळे चर्चेत आली. ती एक इटालियन मॉडेल असून ती गेल्या अनेक महिन्यांपासून अरबाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

जॉर्जियाने अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी मॉडलिंग केली आहे. तिचे जगभरात फॅन्स आहेत.

जॉर्जिया ही खूप चांगली डान्सर असून तिचे डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

जॉर्जिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जाते.

जॉर्जिया तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. ती तिचे व्यायाम करतानाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते.

जॉर्जियाचे बालपण इटली आणि लंडनमध्ये गेले आहे.

जॉर्जियाच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा असून तिला तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फॉलो करतात.