अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीची या कारणामुळे होतेय सोशल मीडियावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 07:19 PM2021-02-08T19:19:39+5:302021-02-08T19:19:39+5:30

जॉर्जिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

जॉर्जियाने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून याच फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

जॉर्जियाचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

जॉर्जिया ही इटालियन मॉडल, अभिनेत्री असून ती तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.

जॉर्जिया आणि बॉलिवुड अभिनेता अरबाज खानच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट झाल्यानंतर जॉर्जिया अरबाजच्या आयुष्यात आली.

जॉर्जियाचे शिक्षण लंडन आणि इटलीमध्ये झाले आहे.

जॉर्जिया सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.