2021 मध्ये प्रदर्शित होणार आहेत या दिग्गजांचे चित्रपट, अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांना लागलीय उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 06:00 AM2021-01-02T06:00:00+5:302021-01-02T06:00:02+5:30

२०२१ मध्ये सलमान खानचा राधे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

आमिर खानच्या ठग्स ऑफ हिंदुस्थान या चित्रपटाला अपयश मिळाले होते. या चित्रपटानंतर दोन वर्षांनंतर लाल सिंह चड्ढा हा त्याचा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत आहे.

आमिर आणि करिना कपूर यांनी याआधी थ्री इडियट या सुपरहिट चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते.

शाहरुख खानचा झिरो फ्लॉप झाल्यानंतर तो कोणत्याच चित्रपटात झळकला नाही. त्याचे फॅन्स त्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. त्याचा आगामी चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

रणवीर सिंगचा सर्कस हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे.

जर्सी हा शाहिद कपूरचा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

२०२० मध्ये कोरोनामुळे अनेक चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. त्यामुळे यावर्षी अनेक सुपरस्टारचे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

अजय देवगनची मुख्य भूमिका असलेला ‘मैदान’, तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’, ‘शाबास मितु’, ८३ यांसारखे अनेक चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. (सभी फोटो इंस्टाग्राम)

तसेच ‘रैम्बो’, ‘द इंटर्न’ हे हॉलीवुडचे सुपरहिट देखील यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. (फाइल फोटो)