गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 10:57 IST2025-08-26T10:44:31+5:302025-08-26T10:57:05+5:30
Numerology Ganesh Chaturthi Ganpati August 2025: तुमचा मूलांक कोणता? गणेशोत्सवात कोणत्या मूलांकावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

Numerology Ganpati August 2025: २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, प्रीति योग, इंद्र योग आणि ब्रह्म योग यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी योग, महाभाग्य योग, लक्ष्मी नारायण योगही जुळून येत आहेत.
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.
१४ विद्या, ६४ कलांचा अधिपती प्रथमेश गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. राशींप्रमाणे मूलांकावरही ग्रह गोचराचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे या गणेशोत्सवाच्या काळातील राजयोगांचा कोणत्या मूलांकावर कसा प्रभाव असेल? तुमचा मूलांक कोणता? जाणून घेऊया...
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतील. नवीन विचारांना चालना मिळू शकेल. एखादी बहुमूल्य महत्त्वाची माहिती मिळू शकेल. घरात पाहुण्यांची रेलचेल वाढू शकेल. कामाच्या क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायासाठी काळ चांगला असेल. कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत संपत्ती वाढीच्या शुभ संधी निर्माण होत राहतील.
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. क्षमता वाढू शकतील. नोकरीत कामाचा ताण वाढू शकेल. परंतु, व्यस्त दिनचर्येत मित्र आणि नातेवाइकांमुळे आनंददायी घटना अनुभव घेऊ शकाल. योग्य मार्गदर्शनानंतरच गुंतवणुकीचा विचार करावा. विद्यार्थ्यांना अडचणीत मदत करावी. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. काही चांगल्या बातम्या मिळू शकतील. आर्थिक लाभाची शुभ शक्यता असेल. अपेक्षेपेक्षा नफा मिळू शकेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. मित्रांकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांना विरोध होऊ शकतो. परंतु, त्याचा सकारात्मक परिणाम दिसल्याने लोकप्रियता वाढू शकेल. कौतुक होऊ शकेल. ज्येष्ठांचे शुभाशिर्वाद लाभतील. वैवाहिक जीवनात सुखद अनुभव येऊ शकतील. आर्थिक आघाडीवर कालावधी सामान्य राहू शकेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. मित्रांच्या भेटी होऊ शकतील. दीर्घकालीन अडकलेले काम मार्गी लागू शकेल. आवडत्या छंदासाठी वेळ काढू शकाल. व्यापारांना लाभ होऊ शकेल. आर्थिक बाबींमध्ये हळूहळू प्रगती कराल. आर्थिक लाभाच्या शुभ संधीही निर्माण होत राहतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. नवीन नोकरीची संधी मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी आनंद वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. यश-प्रगती साध्य करता येऊ शकेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळू शकेल. विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. नफा कमावण्याच्या सुवर्ण संधी मिळतील. जीवनात समृद्धीची शक्यता असेल. व्यवसायात भागीदारीत केलेली गुंतवणूक यश मिळवून देऊ शकते. कामाच्या ठिकाणी एखादा उत्सव होऊ शकतो.
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. अप्रत्यक्ष समस्या, अडचणींचा सामना करावा लागू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, याप्रमाणे काही निर्णय घ्यावे लागतील. कामाचा ताण असताना मित्र किंवा सहकार्याची मदत मोलाची ठरू शकेल. प्रगती होईल. सर्जनशील कामात आवड वाढू शकते. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी असाल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मन प्रसन्न राहू शकेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. नवीन काम मिळू शकते. व्यवसायात काही समस्या आल्या तरी योग्य पद्धतीने हाताळू शकाल. चातुर्य, धैर्य यांमुळे निर्धारित लक्ष्य पूर्ण करू शकाल. घरात आनंदाचे वातावरण असू शकेल. आर्थिक बाबतीत हा काळ अनुकूल राहणार आहे. धनलाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होईल. मन आनंदी राहील आणि कार्यक्षेत्रात प्रगती होईल. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. नवीन काम मिळण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणे हिताचे ठरू शकेल. वेगळ्या स्रोतांची चाचपणी करू शकाल. यात मोलाची मदत लाभू शकेल. मित्रांसाठी अनावश्यक खर्च टाळा. मुले आणि कुटुंबाला प्राधान्य द्यावे. एखादा पुरस्कार, बक्षीस मिळू शकेल. आर्थिक बाबतीतही हा काळ चांगला राहणार आहे. पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. विचारपूर्वक कामे करा. घाई-गडबड करू नका. अन्यथा सगळी मेहनत वाया जाऊ शकेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती मिळाल्याने मन प्रसन्न राहू शकेल. एखाद्या चांगल्या प्रकल्पाकडे आकर्षित होऊ शकता. जीवनात समृद्धीची शक्यता असेल. मोठे यश मिळू शकेल. आर्थिक बाबतीतही वेळ अनुकूल असेल. पैशांशी संबंधित बाबींमध्ये अधिक व्यस्त राहू शकाल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.