गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, WhatsApp Status, Messages, Quotes शेअर करत स्वागत करा गणपती बाप्पाचं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:15 IST2025-08-26T16:40:36+5:302025-08-26T17:15:05+5:30
Ganesh Chaturthi 2025 Wishes in Marathi: 'पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणत ज्या बाप्पाला आपुलकीने निरोप देतो, तोच बाप्पा २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला(Ganesh Chaturthi 2025) आपल्या भेटीसाठी येतोय. त्याचं स्वागत धुमधडाक्यात करूया आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला, गणेशभक्तांना 'या' सुंदर शुभेच्छा पाठवूया.

गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा
टीम टीम टिमबाली ढमाक ढम ढोल वाजं, घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
सनईचा सुर कसा वाऱ्यानं धरला , ढगांचा ढोल घुमु लागला, बिजलीचा ताशा कसा, कडकड कडाडला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला, आला आला आला माझा गणराज आला! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
Ganesh Chaturthi 2025 Quotes in Marathi
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा स्टेट्स
ॐकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥ गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत, डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
गणराज रंगी नाचतो नाचतो, पायि घागर्या करिती रुणझुण, नाद स्वर्गि पोचतो ! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
ॐ गं गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया।। गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!