कलापथकाद्वारे मतदानाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:22 IST2019-04-15T00:21:37+5:302019-04-15T00:22:29+5:30
स्वीप अंतर्गत परभणी विधानसभा मतदारसंघात कला पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ४ एप्रिलपासून परभणी विधानसभा मतदारसंघात मतदानाची गीते, घोषवाक्य, पथनाट्य आदींच्या माध्यमातून कमी मतदान झालेल्या भागामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संकल्पपत्र भरुन घेतले जात आहे. तसेच चुनाव पाठशाला हा उपक्रमही राबविला जात आहे.

कलापथकाद्वारे मतदानाबाबत जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: स्वीप अंतर्गत परभणी विधानसभा मतदारसंघात कला पथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ४ एप्रिलपासून परभणी विधानसभा मतदारसंघात मतदानाची गीते, घोषवाक्य, पथनाट्य आदींच्या माध्यमातून कमी मतदान झालेल्या भागामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संकल्पपत्र भरुन घेतले जात आहे. तसेच चुनाव पाठशाला हा उपक्रमही राबविला जात आहे.
या पथकात एस.वाय. सिद्दीकी, प्रा.डॉ. अलिमोद्दीन काजी, नितीन सेवलकर, इम्रान अहेमद खान, डॉ.खुर्शिद बेगम, शेख चाँद आदींचा समावेश आहे. हे पथक १५ एप्रिल रोजी पिंगळी, नांदखेडा येथे तर १६ एप्रिल रोजी असोला व उखळद आणि १७ एप्रिल रोजी परभणी शहरात जनजागृतीचे उपक्रम राबविणार आहे. या पथकाला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आदींचे मार्गदर्शन मिळत आहे.