पहिल्या कलांमध्ये उद्धव सेनेकडून जल्लोष, उद्धव सेनेचे उमेदवार आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:53 IST2026-01-16T11:52:41+5:302026-01-16T11:53:12+5:30

प्रभाग १४ मध्ये काँग्रेसची आघाडी

Parbhani Election 2026 Uddhav Sena celebrates in the first phase, Uddhav Sena candidates are leading | पहिल्या कलांमध्ये उद्धव सेनेकडून जल्लोष, उद्धव सेनेचे उमेदवार आघाडीवर

पहिल्या कलांमध्ये उद्धव सेनेकडून जल्लोष, उद्धव सेनेचे उमेदवार आघाडीवर

मारोती जंबादे/ परभणी : शहर महानगरपालिकेसाठी गुरुवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या परिसरात सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आघाडी मिळाल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या कलानुसार प्रभाग क्रमांक ८ मध्ये उद्धव सेनेचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत. या निकालानंतर विद्यापीठ परिसरात उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणा देत जल्लोष साजरा केला. पहिल्या कलांमुळे उद्धव सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहित झाले असून, पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत सुरू असून, मोठ्या पोलीस बंदोबस्तात संपूर्ण मतमोजणी होत आहे.

प्रभाग १४ मध्ये काँग्रेसची आघाडी

प्रभाग क्रमांक १४ मध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीअखेर काँग्रेसचे तिन्ही उमेदवार आघाडीवर असून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर त्यांनी लक्षणीय मताधिक्य मिळवले आहे. मात्र हा निकाल पहिल्या फेरीपुरता असून पुढील फेऱ्यांत मतस्थितीत बदल होण्याची शक्यता असल्याने अंतिम निकालासाठी प्रतीक्षा आहे.

Web Title : परभणी नगर निगम चुनावों में उद्धव सेना की शुरुआती बढ़त, जश्न

Web Summary : परभणी नगर निगम चुनावों की शुरुआती गिनती में उद्धव सेना आगे रही, जिसके बाद जश्न मनाया गया। वार्ड 14 में कांग्रेस को बढ़त मिली। कड़ी सुरक्षा के बीच अंतिम नतीजों का इंतजार है।

Web Title : Uddhav Sena Celebrates Early Lead in Parbhani Municipal Elections

Web Summary : Uddhav Sena led in initial Parbhani municipal polls count, prompting celebrations. Congress gained ground in ward 14. Final results awaited amid tight security.