परभणीत उद्धवसेनेच्या 'संजूभाऊ-राहुल पाटील' जोडीची जादू! भाजप-राष्ट्रवादीला मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:47 IST2026-01-17T19:47:00+5:302026-01-17T19:47:43+5:30

परभणीत ३७ जागांसह उद्धवसेना-काँग्रेसचे वर्चस्व

Parabhani Municipal Election Results 2026:The magic of the 'Sanjubhau-Rahul Patil' duo in Parbhani! Uddhav Sena-Congress flag on the municipal corporation with 37 seats | परभणीत उद्धवसेनेच्या 'संजूभाऊ-राहुल पाटील' जोडीची जादू! भाजप-राष्ट्रवादीला मोठा दणका

परभणीत उद्धवसेनेच्या 'संजूभाऊ-राहुल पाटील' जोडीची जादू! भाजप-राष्ट्रवादीला मोठा दणका

- विजय पाटील

परभणी: मागच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा ट्रेंड कायम असल्याचे परभणीकरांनी दाखवून दिले. खा. संजय जाधव, आ. राहुल पाटील यांनी काँग्रेससोबत आघाडी करून ३७ जागा पटकावत स्पष्ट बहुमताने महापालिकेवर वर्चस्व मिळविले. मागच्या वेळी एकहाती सत्ता मिळविणाऱ्या काँग्रेसला यावेळी उद्धवसेनेच्या माध्यमातून सत्तेची संधी मिळणार आहे.

परभणी महापालिकेत मागच्या वेळी काँग्रेसची ३१ जागांसह एकहाती सत्ता होती. राष्ट्रवादी १९ जागांसह दुसऱ्या स्थानी होती. भाजप ८ जागांसह तिसऱ्या, तर शिवसेना ५ जागांसह चक्क चौथ्या स्थानी होती. त्यातही त्यांची दोन शकले पडली आहेत. या निवडणुकीत खा. संजय जाधव यांनी आ. राहुल पाटील यांना पूर्ण मोकळीक देत पाठीशी खंबीर उभे राहिल्याने हे सकारात्मक चित्र दिसत आहे. यामुळे उद्धवसेनेने लोकसभा, विधानसभेचा आपला पारंपरिक मतदार राखण्यासाठी तसेच या समाजातील आपली पकड कायम ठेवण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी केली. काँग्रेसच्याच अनेकांना उद्धवसेनेकडून उभे केले. त्यामुळे २५ जागांसह उद्धवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिला, तर १२ जागांसह काँग्रेस व भाजप दुसऱ्यास्थानी आहे, तर राष्ट्रवादी ११ जागांसह तिसऱ्या स्थानी राहिली. जनसुराज्य शक्तीने मनपाच्या निवडणुकीतही आश्चर्यकारकरीत्या प्रभाग १३ मध्ये ३ जागा पटकावत सोनपेठनंतर येथेही दणक्यात एन्ट्री केली. या ठिकाणीही त्यांनी राष्ट्रवादीलाच धोबीपछाड दिली. दुसरे म्हणजे आ. रत्नाकर गुट्टे यांनी यशवंत सेनेच्या आघाडीच्या माध्यमातून उभे केलेल्या १९ पैकी एकाच उमेदवाराला यश आले, तर प्रभाग ७मध्ये काँग्रेसच्या गडात एका अपक्षाने बाजी मारली.

राष्ट्रवादीचे आ. राजेश विटेकर यांना माजी महापौर प्रताप देशमुख व अक्षय देशमुख यांच्यात शेवटपर्यंत समन्वय घडवून आणता आला नाही. काँग्रेसचे माजी आ. सुरेश देशमुख यांना त्यांच्याच प्रभागात अडकवले. माजी खा. तुकाराम रेंगे यांना मुलगा भाजपकडून उभा राहिल्याने फिरता येत नव्हते. माजी आ. बाबाजानी दुर्राणी, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, भगवान वाघमारे, नदीम इनामदार आदींनी ठरावीक भागातच लक्ष दिले.

महायुती झाली नसल्याचा फटका
पालकमंत्री मेघना बोडर्डीकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी भाजपसाठी जोर तर लावला मात्र यश आले नाही. भाजप महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे व शिंदेसेना जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे या बंधूंच्या युतीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केल्यास त्यांना वेगळे चित्र दिसले असते. मात्र, एकमेकांवर कुरघोडीतच भाजप हैराण होती. ज्या प्रभाग ९ व ४ साठी युती तोडली. त्यापैकी ९ मध्ये सफाया झाला, तर ४ मध्ये अनेक वादांनंतर २ जागा राखल्या. फक्त प्रभाग ५ पूर्ण जिंकला, तर शिंदेसेनेला भोपळाही फोडता आला नसला तरी भाजपला त्यांनी जेरीस आणले.

Web Title : परभणी में उद्धव सेना-कांग्रेस गठबंधन की जीत, भाजपा-राकांपा को हराया।

Web Summary : परभणी में, उद्धव सेना-कांग्रेस गठबंधन ने नगर पालिका चुनावों में स्पष्ट बहुमत हासिल किया, 37 सीटें जीतीं। संजय जाधव और राहुल पाटिल के नेतृत्व में इस जीत ने पिछली सत्तारूढ़ कांग्रेस को हाशिए पर धकेल दिया और भाजपा और राकांपा को महत्वपूर्ण रूप से प्रभावित किया।

Web Title : Uddhav Sena-Congress alliance triumphs in Parbhani, defeating BJP-NCP in election.

Web Summary : In Parbhani, the Uddhav Sena-Congress alliance secured a clear majority in municipal elections, winning 37 seats. This victory, driven by Sanjay Jadhav and Rahul Patil, sidelines the previous ruling Congress and significantly impacts the BJP and NCP, showcasing a shift in local political power.