Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का

By मारोती जुंबडे | Published: June 4, 2024 10:48 AM2024-06-04T10:48:21+5:302024-06-04T10:50:18+5:30

Parabhani Lok Sabha Result 2024: तिसऱ्या फेरी अखेर महाविकास आघाडीला 13 हजारांची आघाडी

Parabhani Lok Sabha Result 2024 Sanjay Jadhav vs. Mahadev Jankar Maharashtra Live result  | Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का

Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का

Parabhani Lok Sabha Result 2024: यंदाची लोकसभा निवडणूक मोठी चुरशीची झाल्याने निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना तिसऱ्या फेरी अखेर 62 हजार 554 मते मिळाली असून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर ( Mahadev Jankar ) यांना 49 हजार 432 मते मिळाली आहेत. यामध्ये संजय जाधव (Sanjay Jadhav ) हे 13 हजार 122 मते घेऊन आघाडीवर आहेत. 

परभणी लोकसभा मतदार संघात ३४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत दिसून येत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतदान मोजणी प्रक्रिया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात सुरुवात झाली आहे. यामध्ये ईव्हीएमच्या पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना 20786 तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना 17612 मते पडली.

त्याचबरोबर दुसऱ्या फेरी अखेर जाधव यांना 20904 तर जानकर यांना 15,149 मते मिळाली तर तिसऱ्या फेरीअखेर 20864 महाविकास आघाडीला तर 16671 मते ही महायुतीला मिळाली आहेत. या तिसऱ्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे संजय जाधव यांना 62554 तर महादेव जानकर यांना 49 हजार 432 मते मिळाली आहेत. या मध्ये 13122 मतांनी पुढे आहेत. चौथ्या फेरीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Parabhani Lok Sabha Result 2024 Sanjay Jadhav vs. Mahadev Jankar Maharashtra Live result 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.