'माझ्या वक्तव्याने गोंधळ, पण मी लोकांच्या पाठीशी ठाम उभा'; अजित पवारांचे टीकेला प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:04 IST2025-11-24T18:03:04+5:302025-11-24T18:04:49+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली मीडियाची धास्ती

'माझ्या वक्तव्याने गोंधळ, पण मी लोकांच्या पाठीशी ठाम उभा'; अजित पवारांचे टीकेला प्रत्युत्तर
जिंतूर : ''राज्याचा अर्थमंत्री या नात्याने निधी देणे माझ्या हातात आहे. मात्र असे काही वक्तव्य केले की, मीडिया त्याचा बाऊ करत असल्याने आता मी निधीबाबत वक्तव्य करताना सुधारणा करेल. यापुढे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील'', असे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर राज्यभर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले
पवार हे जिंतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. ते म्हणाले, ''अर्थ खाते आपल्याकडे असल्याने आपण राज्यभर प्रचार दौऱ्यात विकास कामासाठी निधी देतो'', असे आश्वासन देतो. याचा विरोधी पक्षाने व मीडियाने बाऊ केला. आता काही देतो म्हणणे माझ्यासाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे मी आता काही देतो म्हणण्याऐवजी तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहतो असे आश्वासन या निमित्ताने देतो असे प्रतिपादन केले. त्यामुळे पवारांनी मीडियाची भलतीच धास्ती घेतल्याचे दिसत आहे