जाधव, जानकर वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त

By ज्ञानेश्वर भाले | Published: June 7, 2024 02:50 PM2024-06-07T14:50:16+5:302024-06-07T14:51:04+5:30

...लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या एकूण ३४ उमेदवारांपैकी विजयी ठरलेले उद्धवसेनेचे संजय जाधव आणि त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर वगळता इतर ३२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. 

Deposits of all except Jadhav, Jankar seized | जाधव, जानकर वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त

जाधव, जानकर वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त

परभणी : निवडणूक कुठेही असो अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार प्रत्येकाला आपला प्रभाव दाखविण्याची संधी असते. त्यातच पक्षाने डावलल्यानंतर आपले प्रभावक्षेत्र दाखविण्यासाठी अनेकजण निवडणुकीच्या आखाड्यात इतर पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करतात. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या एकूण ३४ उमेदवारांपैकी विजयी ठरलेले उद्धवसेनेचे संजय जाधव आणि त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर वगळता इतर ३२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. 

परभणी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकूण ३४ जणांनी आपले नशीब आजमावले. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे १३ तर तब्बल २१ उमेदवारांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीत उडी घेतली होती. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला झालेल्या मतदानानंतर ४ जूनच्या मतमोजणीत उद्धवसेनेचे संजय जाधव यांनी तब्बल एक लाख ३४ हजारांपेक्षा अधिक मतांनी रासपाच्या महादेव जानकर यांचा पराभव केला. हे दोन उमेदवार वगळता निवडणूक रिंगणातील उर्वरित ३२ उमेदवारांना आपले डिपॉझिटसुद्धा वाचवता आले नाही. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेतील एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश (१/६) पेक्षा कमी मतदान झालेल्या उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त केली जाते. त्यामुळे फक्त विजयी आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार सोडून इतरांचे डिपॉझिट जप्त झाले.

या राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
पंजाब डख (वंचित), आलमगीर मोहम्मद खान (बसपा), राजन क्षीरसागर (भाकप), संगीता गिरी (स्वराज शक्ती सेना), डॉ. गोवर्धन खंडागळे (बहुजन भारत पार्टी), दशरथ राठोड (महाराष्ट्र विकास आघाडी), विनोद अंभोरे (बहुजन मुक्ती पार्टी), सलीम शेख (एमआयएम), सय्यद इर्शाद अली (सो. डेमो. पार्टी ऑफ इंडिया), श्रीराम जाधव (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी).

या अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
समीर दूधगावकर, किशोर ढगे, सुभाष जावळे, कैलास पवार, गणपत भिसे, अनिल मुदगलकर, अर्जुन भिसे, शिवाजी कांबळे, कारभारी मिठे, किशोरकुमार शिंदे, कृष्णा पवार, गोविंद देशमुख, सखाराम बोंबडे, मुस्तफा शेख, राजाभाऊ काकडे, राजेंद्र अटकल, विजय ठोंबरे, विलास तांगडे, विष्णुदास भोसले, सय्यद अब्दुल सत्तार, ज्ञानेश्वर दहिभाते, आप्पासाहेब कदम या अपक्षांचे डिपॉझिट जप्त झाले.

Web Title: Deposits of all except Jadhav, Jankar seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.