कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 05:52 IST2026-01-10T05:52:29+5:302026-01-10T05:52:29+5:30
व्हिडीओ चित्रीकरण करून पैसे मोजण्यात आले. सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे.

कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : वाशी विभागात नाकाबंदीमध्ये वाहन तपासणी करत असताना एका कारमध्ये १६ लाख १६ हजार रुपयांची रोकड सापडली. निवडणूक विभागाने ही रक्कम जप्त केली असून, पैसे कोठून व कशासाठी आणले याची तपासणी केली जात आहे.
नवी मुंबईत निवडणूक विभागाने भरारी पथके व तपासणी पथके तयार केली आहेत. या माध्यमातून संपूर्ण शहरभर लक्ष ठेवले जात आहे. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता तुर्भे विभागातील प्रभाग १४, १५, १९ व २० मधील तपासणी पथकाने वाशीतील अरेंजा कॉर्नर येथे एका मर्सिडीज कारची तपासणी केली. कारमध्ये साध्या पिशवीमध्ये राेख ठेवल्याचे आढळून आले.
व्हिडीओ चित्रीकरण करून पैसे मोजण्यात आले. सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभाग व जीएसटी विभागालाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सागर मोरे, आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी अमोल पालवे, तुषार दौंडकर, अधीक्षक वसुली अधिकारी संजय गायकवाड, सचिन सूर्यवंशी, अजय शेलार व पथकातील इतर सदस्यांची ही कारवाई केली आहे.