उरणफाटा येथे 10 लाखांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 14:39 IST2019-04-04T14:39:23+5:302019-04-04T14:39:49+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने दक्षता पथके तयार केली आहेत.

उरणफाटा येथे 10 लाखांची रोकड जप्त
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दक्षता पथकांनी एका कारमध्ये 10 लाखांची रक्कम जप्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने दक्षता पथके तयार केली आहेत. बेलापूर विधानसभा मतदार संघातील स्थायी दक्षता पथक क्रमांक 3 यांच्याकडून गुरुवारी उरणफाटा उड्डाणपुलाखाली तपासणी सुरू होती. यावेळी एका इर्टिगा गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये 10 लाख रुपये रोख रक्कम आढळून आली आहे.
या रकमेबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तसेच पुरावे सादर करू न शकल्याने सदर रक्कम सीबीडी पोलिसात जमा करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.