लाेकसभा निवडणुकीचा नेमका खर्च किती? जबाबदारी कोणाची? वाचा महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 02:31 PM2024-03-18T14:31:33+5:302024-03-18T14:33:20+5:30

देशात लाेकसभा निवडणूक जाहीर झाली असून ७ टप्प्यांमध्ये मतदान हाेणार आहे

What is the exact cost of Lok Sabha elections whose responsibility Read important information | लाेकसभा निवडणुकीचा नेमका खर्च किती? जबाबदारी कोणाची? वाचा महत्त्वाची माहिती

लाेकसभा निवडणुकीचा नेमका खर्च किती? जबाबदारी कोणाची? वाचा महत्त्वाची माहिती

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशात लाेकसभा निवडणूक जाहीर झाली असून ७ टप्प्यांमध्ये मतदान हाेणार आहे. प्रत्यक्ष मतदानापासून मतमाेजणीपर्यंत जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. जगातील सर्वात माेठ्या लाेकशाहीची निवडणूकही तेवढीच व्यापक आहे. निवडणुकीवर प्रचंड खर्च हाेताे. देशात १९५१-५२मध्ये पहिली लाेकसभा निवडणूक झाली. तेव्हापासून आतापर्यंत निवडणुकीचा खर्च किती वाढला आहे? जाणून घेऊया...

खर्चाची जबाबदारी काेणाची?

लाेकसभा निवडणुकीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलते. निवडणूक आयाेगाच्या प्रशासकीय कामकाजापासून मतदार ओळखपत्र बनविणे, सुरक्षा व्यवस्था, मतदान केंद्र उभारणी, इव्हीएम खरेदी, जनजागृती इत्यादी खर्चांचा त्यात समावेश आहे.

यावर्षी खर्च किती?

  • ५,४३० काेटी रुपये २०१७ ते २०२० या कालावधीत ईव्हीएम खरेदीसाठी करण्यात आला.
  • ३२१ काेटी रुपये निवडणूक आयाेगाला चालू आर्थिक वर्षात निवडणुकीसाठी दिलेले आहेत.
  • १,००३ काेटी रुपयांची तरतूद निवडणुकीच्या इतर खर्चांसाठी केली आहे.
  • २,१८३ काेटींची तरतूद निवडणुकांसाठी २०२३मध्ये केली होती. 
  • २,४४२ काेटी रुपयांची तरतूद यावर्षीच्या निवडणुकांसाठी केलेली आहे.
  • १,००० काेटी रुपये लाेकसभा निवडणुकीसाठी लागतील.
  • ४०४ काेटी रुपयांची तरतूद मतदार ओळखपत्रांसाठी केली. 
  • ७९ काेटी रुपयांची तरतूद मतदार ओळखपत्रांसाठी गेल्यावर्षी केली हाेती.
  • ३४ काेटी रुपये ईव्हीएमसाठी लागणार आहेत.


काेणत्या निवडणुकीत किती खर्च?

  • १९५१-५२    १०.५ 
  • १९५७    ५.९
  • १९६२    ७.३
  • १९६७    १०.८
  • १९७१    ११.६
  • १९७७    २३.०
  • १९८०    ५४.८
  • १९८५    ८१.५
  • १९८९    १५४.२
  • १९९१    ३५९.१
  • १९९६    ५९७.३
  • १९९८    ६६६.२
  • १९९९    ९४७.७
  • २००४    १,०१६.१
  • २००९    १,११४.४
  • २०१४    ३,८७०.३

Web Title: What is the exact cost of Lok Sabha elections whose responsibility Read important information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.