Video: दिग्विजय सिंहानी विचारलं, 15 लाख आले का? स्टेजवर येऊन युवकाने दिलं हे उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 19:57 IST2019-04-22T19:56:10+5:302019-04-22T19:57:19+5:30

ऐन निवडणुकीच्या प्रचारात व्यासपीठावर झालेला प्रकाराने काँग्रेस नेत्यांची चांगलीच गोची झाली.

Video: Digvijay Singh asked, why did 15 lakhs come? The answer is given by youth on stage | Video: दिग्विजय सिंहानी विचारलं, 15 लाख आले का? स्टेजवर येऊन युवकाने दिलं हे उत्तर 

Video: दिग्विजय सिंहानी विचारलं, 15 लाख आले का? स्टेजवर येऊन युवकाने दिलं हे उत्तर 

भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नागरिकांना 15 लाख रुपयांचे आश्वासन दिलं होतं. मला सांगा कोणाच्या खात्यात पंधरा लाख आलेत? असा प्रश्न काँग्रेसचे भोपाळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी जाहीर सभेत विचारला. यावर एका तरुणाने हात वर केल्याने दिग्विजय सिंह यांनी त्या तरुणाला व्यासपीठावर बोलवले. 

दिग्विजय सिंह यांनी तरुणाला स्टेजवर बोलवून विचारलं त्यावर तरुणाने माईक हातात घेत मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांना मारलं असं बोलल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. तरुणाच्या उत्तराने व्यासपीठावर काँग्रेसचे पदाधिकारी गोंधळात पडल्याने त्या तरुणाला स्टेजवरुन खाली उतरविण्यात आले. मात्र त्यानंतर तारांबळ झालेले दिग्विजय सिंह यांनी तरुणाला जॉब मिळाला का? 15 लाख खिशात आले, जॉब मिळाला असा पुन्हा प्रश्न विचारला. पण ऐन प्रचारात निवडणुकीच्या व्यासपीठावर झालेला प्रकाराने काँग्रेस नेत्यांची चांगलीच गोची झाली.


Web Title: Video: Digvijay Singh asked, why did 15 lakhs come? The answer is given by youth on stage