हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गदारोळ करणाऱ्यांसाठी पश्चात्तापाची संधी..., हातची सोडू नका - PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 11:16 AM2024-01-31T11:16:47+5:302024-01-31T11:17:50+5:30

ज्यानी सभागृहात उत्तम विचार मांडले असेतील, ते आजही फार मोठ्या वर्गाच्या स्मरणात असतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

This budget session is an opportunity for rioters to repent don't let it go says PM Narendra Modi | हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गदारोळ करणाऱ्यांसाठी पश्चात्तापाची संधी..., हातची सोडू नका - PM मोदी

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गदारोळ करणाऱ्यांसाठी पश्चात्तापाची संधी..., हातची सोडू नका - PM मोदी

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असताना. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारमण यांच्याकडून अंतरीम अर्थसंकल्प, एक प्रकारे नारीशक्तीच्या साक्षात्काराचे पर्व आहे. मी असे मानतो की, गेल्या दहा वर्षांत ज्यांन-ज्यांना जो-जो मार्ग सुचल्या. त्या प्रकारे संसदेत सर्वांनी आपापले कार्य केले. मात्र, मी एवढे नक्कीच म्हणेत, की ज्यांचा गदारोळ करण्याचा स्वभावच झाला आहे. जे सवयीने लोकशाही मूल्यांचे वस्त्रहरण करतात, असे सर्व माननीय खासदार, आज जेव्हा अखेरच्या सत्रात एकत्र येत आहेत, तेव्हा नक्कीच आत्मपरीक्षण करतील की, त्यांनी गेल्या 10 वर्षांत जे केले, हवे तर आपल्या लोकसभा मतदार संघातही 100 लोकांना विचारावे. कुणालाही आठवत नसेल, कुणाला नावही माहीत नसेल, ज्यांनी गदारोळ केला. पण, विरोधाचा स्वर तिखट जरी असला, तरी ज्यानी सभागृहात उत्तम विचार मांडले असतील, ते आजही फार मोठ्या वर्गाच्या स्मरणात असतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते अधिवेशनाच्या सुरुवातीला पत्रकारांसोबत बोलत होते.

मोदी म्हणाले, "येणाऱ्या काळात सभागृहातील चर्चा कुणी बघेल, तेव्हा त्यांचा एक एक शब्द इतिहास म्हणून नोंदवला जाईल. मग भलेही ज्यांनी विरोध केला असेल, मात्र बुद्धी प्रतिभा दाखवली असेल, आमच्या विरोधात कठोर शब्दात मतं मांडली असतील. मी मानतो की, देशातील एक मोठा वर्ग, लोकशाही प्रेमी या व्यवहाराचे कौतुक करत असेल. पण, ज्यांनी केवळ नकारात्मकता आणि केवळ गदाररोळच केला असेल त्यांना क्वचितच कुणी स्मरणात ठेवेल."

"आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक संधी आहे, पश्चात्तापाचीही संधी आहे. काही चागल्या गोष्टी सोडण्याचीही संधी आहे. मी अशा सर्वच खासदारांना आग्रह करेल की, आपण ही संधी सोडू नका. चांगल्यात चांगले परफॉर्म करा. देश हितार्थ चांगल्यात चांगले विचार सभागृहात मांडा," असेही मोदी म्हणाले.
 
मला विश्वास आहे की, जेव्हा निवडणुका जवळ आलेल्या असतात. तेव्हा पूर्ण बजेट ठेवले जात नाही. आम्हीही याच परंपेचे निर्वहन करत, पूर्ण बजेट नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्यासमोर घेऊन येऊ. उद्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या सर्वांसमोर आपला अर्थसंकल्प सादर करतील, असेही मोदी म्हणाले.

Web Title: This budget session is an opportunity for rioters to repent don't let it go says PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.