before taking oath minister took the blessings of the daughter | व्हिडिओ : मंत्रीपदाची शपथ घेण्याआधी 'या' खासदाराने वडीलधाऱ्यांऐवजी घेतला मुलींचा आशीर्वाद
व्हिडिओ : मंत्रीपदाची शपथ घेण्याआधी 'या' खासदाराने वडीलधाऱ्यांऐवजी घेतला मुलींचा आशीर्वाद

नवी दिल्ली - राजकीय नेत्यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या अनेक बातम्या माध्यमांमध्ये येत असतात. मात्र यावेळी एका केंद्रीय मंत्र्यांच्या कृतीने सगळीकडेच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कौतुकही होत आहे. केंद्रीय मंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झालेले मध्य प्रदेशातील प्रताप सिंह पटेल यांनी मुलींकडून औक्षण करून घेताना चक्क मुलीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मध्यप्रदेशातून प्रल्हाद सिंह पटेल यांची वर्णी लागली आहे. यामुळे प्रल्हाद सिंह यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मंत्रिपदासाठी वर्णी लागल्याचं कळताचं त्यांचं औक्षण करण्यात आलं. यावेळी खासदार प्रल्हाद सिंह पटेल यांनी आपल्या मुलींनाही नमस्कार करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. 

भारतीय जनता पक्षाने मागील कार्यकाळात 'बेटी पढाव बेटी बचाव'चा नारा दिला होता. महिला सक्षमीकरणासाठी भाजपकडून नेहमीच प्रयत्न करण्यात येतात. मात्र मुलीला वडीलधाऱ्याप्रमाणे वागविण्याची घटना प्रथमच घडली आहे. तेही केंद्रीयमंत्र्यांनी असे केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.


Web Title: before taking oath minister took the blessings of the daughter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.