‘शोले’च्या रामगडमध्ये होतेय प्रतिष्ठेची लढत; काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

By वसंत भोसले | Published: April 17, 2024 06:35 AM2024-04-17T06:35:16+5:302024-04-17T06:36:47+5:30

बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

Sholay's Ramgarh is fighting for prestige prestige of Congress is at stake | ‘शोले’च्या रामगडमध्ये होतेय प्रतिष्ठेची लढत; काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

‘शोले’च्या रामगडमध्ये होतेय प्रतिष्ठेची लढत; काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

डॉ. वसंत भोसले, लोकमत न्यूज नेटवर्क
बंगळुरू
: शोले चित्रपटाचे चित्रीकरण झालेल्या रामगडचा (रामनगरा) भाग असलेल्या बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सलग दोन वेळा विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार डी. के. सुरेश यांना भाजपचे उमेदवार प्रतिष्ठित हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ यांच्याशी सामना करावा लागत आहे.

मोदी लाट असतानाही काँग्रेसचे सुरेश यांनी येथे सलग दोन वेळा विजय मिळवला असून, आता ते हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत.  त्यांचे ज्येष्ठ बंधू डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री आहेत. भाजपने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे जावई डॉ. सी. एन. मंजुनाथ यांना उमेदवारी दिली आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे 
- कनकपुरा आणि रामनगरा हा भाग वगळता ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष.
- माडादी या मागास तालुक्याच्या विषय ऐरणीवर.
- शहरी भागातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आव्हान.
- डी. के. सुरेश यांच्या जनसंपर्काच्या तुलनेत डॉ. मंजुनाथ यांना मर्यादा.
- काँग्रेस पक्ष कर्नाटकात सत्तेत असल्याचा सुरेश यांना लाभ.

२०१९ मध्ये काय घडले? 
डी. के. सुरेश (काँग्रेस) विजयी ८,७८,२५८ 
अश्वथानारायण गौडा (भाजप) ६,७१,३८८

Web Title: Sholay's Ramgarh is fighting for prestige prestige of Congress is at stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.