ऐकावं ते नवलंच; शशी थरुर यांची इंग्रजी समजण्यासाठी तरुण चक्क Oxford डिक्शनरी घेऊन आला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 06:08 PM2023-02-27T18:08:20+5:302023-02-27T18:09:02+5:30

नागालँडमध्ये शशी थरुर यांनी एका कार्यक्रमता हजेरी लावली, यावेळी एक तरुण डिक्शनरी घेऊन आला.

Shashi Tharoor, Man carry Oxford dictionary to understand Shashi Tharoor’s speech at Nagaland event; Watch | ऐकावं ते नवलंच; शशी थरुर यांची इंग्रजी समजण्यासाठी तरुण चक्क Oxford डिक्शनरी घेऊन आला

ऐकावं ते नवलंच; शशी थरुर यांची इंग्रजी समजण्यासाठी तरुण चक्क Oxford डिक्शनरी घेऊन आला

googlenewsNext


Shashi Tharoor : काँग्रेस नेते शशी थरुर त्यांच्या अस्खलित इंग्रजीसाठी ओळखले जातात. ते नेहमी इंग्रजी बोलताना अतिशय कठीण शब्दांचा वापर करतात. त्यांचे इंग्रजी सामान्यांना कळणे फार अवघड असते. यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक व्यक्ती थरुर यांचे भाषण समजून घेण्यासाठी चक्क ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरी घेऊन गेल्याचे दिसत आहे. 

26 फेब्रुवारी रोजी आर लुंगलेंड यांनी नागालँडमध्ये टॉक शो आयोजित केला होता. या कार्यक्रमात काँग्रेस खासदार शशी थरुर राज्यातील तरुणांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी तरुणांशी इंग्रजीतून संवाद साधला. त्यांची इंग्रजी कळण्यासाठी एक तरुण चक्क ऑक्सफर्ड डिक्शनरी घेऊन आला. व्हायरल व्हिडिओमध्ये थरुर बोलत आहेत आणि तो तरुण खुर्चीवर डिक्शनरी घेऊन बसल्याचे दिसत आहे.

टॉक शोचा होस्ट आर लुंगलेंग यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. लुंगलेंगने व्हिडिओला कॅप्शन दिले की ‘मी हे पाहिले नसते, तर याला विनोदच समजलो असतो.' नेटिझन्सना हा व्हिडिओ मजेदार आणि विनोदी वाटत असून, अनेकजण यावर कमेंट्स आणि इमोजीतून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Web Title: Shashi Tharoor, Man carry Oxford dictionary to understand Shashi Tharoor’s speech at Nagaland event; Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.