Search for 'Water Fuel Engine', a car run 30 km in 1 liter of water | 'वॉटर फ्युअल इंजिन'चा लागला शोध, 1 लिटर पाण्यात 30 किमी धावणार गाडी
'वॉटर फ्युअल इंजिन'चा लागला शोध, 1 लिटर पाण्यात 30 किमी धावणार गाडी

मुंबई - देशातील इंधन दरवाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमीच त्रासदायक आणि आर्थिक बजेट कोलमडणारी ठरत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. हैदराबादमधील एका व्यक्तीने वॉटर फ्युअल इंजिन बनवलंय. सुंदर रमैय्या नावाच्या व्यक्तीने हा भन्नाट शोध लावला आहे. सुंदर यांच्या दाव्यानुसार हे इंजिन वापरल्यास कुठलिही गाडी 1 लिटर पाण्यामध्ये 30 किमीपर्यंत रस्त्यावर धावेल. 

आपल्या इंजिन शोधाबाबत सांगताना रमैय्याने म्हटले की, या इंजिनाच्या वापराने केवळ पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपासून सुटका मिळणार आहे. तर, इंधनापासून होणाऱ्या प्रदुषणालाही आळा घालण्यात येईल. सुंदर यांनी एका वॉटर फ्युअल टेक्नॉलॉजीचा शोध लावला आहे. त्यामुळे पाण्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहन धावणार आहे. या इंजिनामुळे पर्यावरणाला कुठलिही हानी पोहोचणार नसून यातून ऑक्सीजन बाहेर पडेल, असा दावाही सुंदर यांनी केलाय. तसेच, 1 लिटर पाण्यामध्ये 30 किमीपर्यंतचा प्रवास वाहनातून करता येईल, असेही सुंदर यांनी सांगितलंय. 

सुंदर रमैय्या यांच्या या नवतंत्रज्ञानाच्या शोधामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अनेकदा असे दावे करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ते उतरले  नाहीत. मात्र, सुंदर यांनी प्रायोगित तत्वाने हा दावा प्रत्यक्षात उरवरल्याचं दिसून येतंय. सुंदर यांचा हा दावा खरा ठराल्यास, ऑटोमोबाईल क्षेत्रातील क्रांती आणि पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीपासून सर्वसामान्यांची सुटका होईल. त्यामुळे सुंदर यांच्या या रिसर्च आणि टेक्नॉलिजीची संबंधित ऑटोमोबाईल क्षेत्रातील इंजिनिअर्सने आणि आयआयटी या संस्थेकडून दखल घेतल्यास ते नवक्रांतीच्या दिशेने मोठे पाऊल मानले जाईल.  

Web Title: Search for 'Water Fuel Engine', a car run 30 km in 1 liter of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.