रायपूरच्या मॅग्नेटो मॉलमध्ये जमावाने जोरदार केला हल्ला, ख्रिसमसच्या सजावटीची केली नासधूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:51 IST2025-12-25T14:31:57+5:302025-12-25T14:51:02+5:30
छत्तीसगड बंद दरम्यान, काठ्या आणि रॉड घेऊन सशस्त्र निदर्शकांनी रायपूरमधील मॅग्नेटो मॉलमध्ये प्रवेश केला आणि ख्रिसमस ट्री आणि सजावटीच्या वस्तूंची तोडफोड केली, यामुळे मॉल परिसरात गोंधळ उडाला.

रायपूरच्या मॅग्नेटो मॉलमध्ये जमावाने जोरदार केला हल्ला, ख्रिसमसच्या सजावटीची केली नासधूस
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील मॅग्नेटो मॉलमध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. काठ्या आणि रॉड घेऊन सुमारे ८०-९० जणांच्या जमावाने मॉलमध्ये घुसून नाताळच्या सजावटीची तोडफोड केली. धार्मिक धर्मांतराच्या आरोपांच्या निषेधार्थ राज्यात बंद पुकारण्यात आला होता त्या दिवशी ही घटना घडली.
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
जमावाने ख्रिसमस ट्री, दिवे आणि इतर सजावटीची तोडफोड केली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. आम्ही गेल्या १६ वर्षांपासून प्रत्येक बंदला पाठिंबा देत आहोत, परंतु आम्हाला असे वर्तन कधीच दिसले नाही, जमावाने आम्हाला धमकावले आणि हिंसाचार केला, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. अनेक महिला रडू लागल्या. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकावर जमावाने हल्ला केला.
बंदचे कारण?
कथित धर्मांतराच्या विरोधात सर्व हिंदू समाजाने राज्यव्यापी बंदची हाक दिली. त्याचे मुख्य कारण कांकेर जिल्ह्यातील बडेतेवाडा गावात झालेला वाद होता. १६ डिसेंबर रोजी गावप्रमुख राजमान सलाम यांनी त्यांच्या वडिलांचा मृतदेह त्यांच्या खाजगी जमिनीवर ख्रिश्चन पद्धतीने दफन केला. संतप्त जमावाने प्रार्थना मंडपाची तोडफोड केली आणि वस्तू जाळल्या. १८ डिसेंबर रोजी दोन्ही समुदायांमध्ये संघर्ष झाला, यामध्ये दगडफेक झाली आणि २० हून अधिक पोलिसांसह अनेक लोक जखमी झाले. नंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार स्मशानभूमीत पुरण्यात आला. या घटनेमुळे राज्यभर तणाव वाढला.