पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 20:52 IST2024-07-07T20:51:34+5:302024-07-07T20:52:18+5:30
या रथयात्रेत देशभरातील दहा लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले.

पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी
Puri Jagannath Rath Yatra 2024 : ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाची भव्य रथ यात्रा काढण्यात आले. यावेळी रथ ओढताना अचानक चेंगराचेंगरी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, 400 हून अधिक भाविक खाली पडले, ज्यात एका भाविकाचा मृत्यू झाला. तसेच, अनेकजण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यातील काही जखमींना प्राथमिक उपचारानंतर तात्काळ घरी सोडण्यात आले.
#WATCH | Odisha | Devotees throng in large numbers to witness the two-day Lord Jagannath Yatra that begins today in Puri. pic.twitter.com/Z65j3iM2H1
— ANI (@ANI) July 7, 2024
द्रौपदी मुर्मू शंकराचार्यांनी घेतले दर्शन
पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी त्यांच्या शिष्यांसह भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांचे दर्शन घेतले. यानंतर पुरीच्या राजाने 'छेरा पहानारा' (रथ साफ करणे) विधी पार पाडला आणि सायंकाळी 5.20 च्या सुमारास रथ ओढण्याची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनीदेखील रथांचे दर्शन घेतले.
10 लाख भाविक सहभागी
शहरातील प्रमुख मार्गावरून रथयात्रा संथगतीने पुढे सरकत होती. एका अंदाजानुसार, सुमारे 10 लाख भाविक रथ उत्सवात सहभागी झाले होते. बहुतांश भक्त ओडिशा आणि शेजारील राज्यांतील होते. रथयात्रेत परदेशातूनही अनेक जण सहभागी झाले होते. पुरीचे पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी सांगितले की, रथयात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 180 प्लाटून (एका प्लाटूनमध्ये 30 सैनिक असतात) सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.