नवे निवडणूक आयुक्त आहेत इतिहास तज्ज्ञ; पदभार स्वीकारला, निवडणुकीवर केली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 05:32 AM2024-03-16T05:32:25+5:302024-03-16T05:33:04+5:30

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी ज्ञानेशकुमार आणि संधू यांचे स्वागत केले.

new election commissioner is a history expert assumed office discussed the lok sabha election 2024 | नवे निवडणूक आयुक्त आहेत इतिहास तज्ज्ञ; पदभार स्वीकारला, निवडणुकीवर केली चर्चा

नवे निवडणूक आयुक्त आहेत इतिहास तज्ज्ञ; पदभार स्वीकारला, निवडणुकीवर केली चर्चा

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशाच्या निवडणूक आयाेगाच्या आयुक्त पदाचा ज्ञानेशकुमार आणि सुखबीर संधू यांनी कार्यभार स्वीकारला. सुखबीर संधू हे इतिहासतज्ज्ञ, तर ज्ञानेशकुमार हे सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांच्या नावाची घाेषणा १४ मार्च राेजी करण्यात आली हाेती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी ज्ञानेशकुमार आणि संधू यांचे स्वागत केले. दाेघांनी पदभार स्वीकारल्यानंतर निवडणूक आयाेगाची बैठक घेण्यात आली. त्यात लाेकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. 

सुखबीर संधू

- १९८८च्या तुकडीचे उत्तराखंड (तत्कालीन उत्तर प्रदेश) कॅडरचे आयएएस अधिकारी.
- संधू हे डाॅक्टर आणि इतिहासतज्ज्ञ आहेत. याशिवाय कायद्याचेही पदवीधर आहेत.
- उत्तराखंड आणि पंजाबमध्ये ४ मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.

ज्ञानेश कुमार 

- १९८८च्या तुकडीचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी.
- सहकार मंत्रालयातून नुकतेच सचिव पदावरुन निवृत्त झाले.
- सहकार मंत्रालयाची स्थापना आणि कार्यप्रणालीमध्ये त्यांचे माेलाचे याेगदान हाेते.
- गृहमंत्रालयात काश्मीर विभागाचे सहसचिव म्हणून काम पाहिले.
 

Web Title: new election commissioner is a history expert assumed office discussed the lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.