कोण आहे निर्मला सीतारामन यांची मुलगी वाङ्मयी परकला? PM मोदींच्या निकटवर्तीयाशी केलाय विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:39 IST2025-02-03T16:26:20+5:302025-02-03T16:39:12+5:30

Vangmayi Parakala, daughter of Nirmala Sitharaman : ती देखील तिच्या पालकांप्रमाणेच हुशार आहे. पण ती लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करते.

Meet Vangmayi Parakala daughter of Finance Minister Nirmala Sitharaman married to PM Modi close aide Know more about her education | कोण आहे निर्मला सीतारामन यांची मुलगी वाङ्मयी परकला? PM मोदींच्या निकटवर्तीयाशी केलाय विवाह

कोण आहे निर्मला सीतारामन यांची मुलगी वाङ्मयी परकला? PM मोदींच्या निकटवर्तीयाशी केलाय विवाह

Vangmayi Parakala, daughter of Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन हे नाव प्रत्येक भारतीयाला नक्कीच माहिती आहे. त्या आपल्या देशाची आर्थिक बाजू समर्थपणे सांभाळत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी केलेल्या घोषणांबाबत त्या गेल्या २-३ दिवसांपासून चर्चेत आहेत. पण तुम्हाला निर्मला सीतारामन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती आहे का? निर्मला सीतारामन या एक मुलगी आहे. ती देखील तिच्या पालकांप्रमाणेच हुशार आहे. तिचं नाव वाङ्मयी परकाला. वाङ्मयी स्वत: मात्र लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करते. जाणून घेऊया तिच्याबद्दल...

वाङ्मयी मूळची कुठली?

वाङ्मयी परकाला हिचा जन्म २० मे १९९१ रोजी चेन्नई येथे झाला. तिची आई निर्मला सीतारामन या एक राजकीय व्यक्ती आहेत आणि सध्या भारताच्या अर्थमंत्री म्हणून काम पाहतात. दुसरीकडे तिचे वडील परकाला प्रभाकर हे एक प्रतिष्ठित राजकीय अर्थशास्त्रज्ञ आणि सामाजिक समालोचक आहेत. त्यांनी आंध्र प्रदेश सरकारचे कॅबिनेट दर्जाचे दळणवळण सल्लागार म्हणून काम केले आहे. तसेच अर्थशास्त्रातील इतर महत्त्वाच्या पदांवरही काम केले आहे. आई वडील दोघेही पब्लिक फिगर असूनही वाङ्मयी मात्र फारशी प्रसिद्धीझोतात येणं टाळते.

फोटो जर्नालिझममध्ये गती

वाङ्मयी परकाला हिने दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली आहे. कथाकथन आणि संभाषण कौशल्य या विषयात रूची असल्यामुळे तिने नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी, यूएसए येथील प्रतिष्ठित मेडिल स्कूल ऑफ जर्नलिझममधून पत्रकारितेत मास्टर ऑफ सायन्सचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने लेखन आणि पत्रकारितेत आपले करियर घडवण्यास सुरुवात केली. वाङ्मयी परकाला सध्या मिंट लाउंज या राष्ट्रीय प्रकाशनात एक फीचर लेखिका आहे. तेथे काम करतानाच तिला फोटो पत्रकारितेत सूर गवसला. लिखणाव्यतिरिक्त ती तिच्या फोटोग्राफीतून व्यक्त होते आणि  इंस्टाग्रामवर तिचे 'बेस्ट शॉट्स' पोस्ट करते.

पंतप्रधान मोदी यांच्या निकटवर्तीयाशी विवाहबद्ध

वाङ्मयीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने जून २०२३ मध्ये प्रतीक दोशी यांच्याशी बेंगळुरू येथे लग्न केले. प्रतीक दोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे सहकारी आहेत आणि २०१४ पासून त्यांच्यासोबत काम करत आहेत. त्यांचे लग्न पारंपरिक ब्राह्मण पद्धतीने मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत झाले. वाङ्मयीचे पती प्रतीक दोशी यांचे पंतप्रधान कार्यालयात (PMO) विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) पदावर आहेत. प्रतीक दोशी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दीर्घकाळचा संबंध आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते त्यांच्यासोबत आहेत. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दोशी यांनी PMO मध्ये आणले गेले.

Web Title: Meet Vangmayi Parakala daughter of Finance Minister Nirmala Sitharaman married to PM Modi close aide Know more about her education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.