लोकसभा निवडणूक: कोणत्या टप्प्यातील उमेदवारांची संपत्ती सर्वांत कमी? हे आहेत सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप ३ उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:38 PM2024-05-23T12:38:48+5:302024-05-23T12:39:09+5:30

सातव्या टप्प्यात देशातील ७ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ लोकसभा मतदारसंघात एकूण ९०४ उमेदवार रिंगणात उभे आहेत.

Lok Sabha Elections Which phase candidates have the lowest wealth Here are the top 3 candidates with the most wealth | लोकसभा निवडणूक: कोणत्या टप्प्यातील उमेदवारांची संपत्ती सर्वांत कमी? हे आहेत सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप ३ उमेदवार

लोकसभा निवडणूक: कोणत्या टप्प्यातील उमेदवारांची संपत्ती सर्वांत कमी? हे आहेत सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप ३ उमेदवार

नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात असून सातही टप्प्यांतील उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत सातही टप्प्यांत दाखल झालेल्या उमेदवारांच्या नामांकन अर्जांचे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) व नॅशनल इलेक्शन वॉचने विश्लेषण केले. त्यानुसार, सातव्या टप्प्यातील उमेदवारांची सरासरी संपत्ती ही उर्वरित टप्प्यातील उमेदवारांच्या सरासरी संपत्तीपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातव्या टप्प्यात देशातील ७ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ लोकसभा मतदारसंघात एकूण ९०४ उमेदवार रिंगणात उभे आहेत.

उमेदवारांचे शिक्षण तरी किती? 
अशिक्षित    २४ 
शिक्षित    २६ 
५वी पास    ३१ 
८वी पास    ६२ 
१०वी पास    १३३ 
१२वी पास    १७६ 
डिप्लोमा    २० 
पदवीधर    १६४ 
पदव्युत्तर पदवी    १५९ 
पीएच.डी.    २४

राज्यनिहाय कोट्यधीश उमेदवारांची संख्या
पंजाब    १०२ (३१%) 
उत्तर प्रदेश    ५५ (३८%) 
बिहार    ५० (३७%) 
प.बंगाल    ३१ (२५%) 
ओडिशा    २० (३०%) 
झारखंड    ९ (१७%) 
हिमाचल प्रदेश    २३ (६२%) 
चंडीगड    ९ (४७%) 

पक्षनिहाय कोट्यधीश उमेदवार -
पक्ष    उमेदवार    कोट्यधीश उमेदवार
बीजेडी    १३    १३
आप    ९    ९
बीजेडी    ६    ६
काँग्रेस    ३१    ३० 
तृणमूल    ९    ८
भाजप    ५१    ४४ 
सीपीआय (एम)    ८    ४
बसपा    ५६    २२

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी -
साधारण गुन्हे    १९९ 
गंभीर गुन्हे    १५१ 
महिलांविषयक गुन्हे    १३ 
खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे    २७ 
द्वेषपूर्वक विधान केल्याचे गुन्हे    २५ 
खुनाशी संबंधित गुन्हे    ४

Web Title: Lok Sabha Elections Which phase candidates have the lowest wealth Here are the top 3 candidates with the most wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.