Video - मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार बनला 'न्हावी'; लोकांची केली दाढी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 02:52 PM2024-04-05T14:52:32+5:302024-04-05T15:01:33+5:30

Lok Sabha Elections 2024 : प्रत्येकजण आपापल्या भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, निवडणूक प्रचारावेळी एका उमेदवाराचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. 

Lok Sabha Elections 2024 Ramanathapuram Independent candidate becomes barber for day during election campaign | Video - मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार बनला 'न्हावी'; लोकांची केली दाढी

Video - मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार बनला 'न्हावी'; लोकांची केली दाढी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सध्या सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त असून जोरदार तयारी करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, निवडणूक प्रचारावेळी एका उमेदवाराचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. 

तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये अशीच एक अजब घटना समोर आली आहे. रामेश्वरमच्या रामनाथपुरममधील परिराजन येथील अपक्ष उमेदवाराची निवडणुकीच्या प्रचाराच्या दिवशी वेगळीच शैली पाहायला मिळाली. मतं मिळतील या आशेने उमेदवाराने हटके मार्ग निवडत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तो एका दिवसासाठी चक्क न्हावी बनला आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. तामिळनाडूच्या रामेश्वरममधील अपक्ष उमेदवाराने न्हावी बनत सलूनमध्ये आलेल्या लोकांची चक्क दाढी केली, त्यांचे केस कापले आहेत. त्यानंतर त्याने हात जोडून लोकांना आपल्यालाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: Lok Sabha Elections 2024 Ramanathapuram Independent candidate becomes barber for day during election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.