पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा बसला; महाराष्ट्रातील ५, देशातील १०२ जागांसाठी उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 07:10 AM2024-04-18T07:10:00+5:302024-04-18T07:10:08+5:30

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी ६ वाजता शांत झाल्या.

Lok Sabha Elections 2024 first phase of the campaign has died down Voting tomorrow for 5 seats in Maharashtra, 102 seats in the country | पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा बसला; महाराष्ट्रातील ५, देशातील १०२ जागांसाठी उद्या मतदान

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा बसला; महाराष्ट्रातील ५, देशातील १०२ जागांसाठी उद्या मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी ६ वाजता शांत झाल्या. संवेदनशील असलेल्या नक्षलग्रस्त भागातील प्रचार दुपारी तीन वाजता थांबला. २१ राज्यांतील १०२ मतदारसंघात शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपैकी पहिल्या टप्प्यात सर्वाधिक १०२ मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

याशिवाय सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्याही निवडणुका होणार आहे. या टप्प्यासाठी २० मार्च रोजी अधिसूचना निघाली होती. ३० मार्च रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर एकूण १६२५ उमेदवार रिंगणात राहिले. देशातील प्रमुख मतदारसंघाचा समावेश असलेल्या या टप्प्यात देशभरात प्रचाराचा धुराळा उडाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवारासह त्यांच्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात व्यग्र होते.

मोदी की गॅरंटी विरुद्ध न्यायपत्र
प्रचारादरम्यान भाजपकडून 'मोदी की गॅरंटी', तर कॉंग्रेसकडून 'न्याय पत्र' या नावाने जाहीरनामा मतदारांपुढे मांडण्यात आला. भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी संहिता, एक देश, एक निवडणुकीचा आश्वासन देण्यात आले, तर कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात पाच न्यायांसह २५ गॅरंटींचे आश्वासन देण्यात आले.

पहिल्या टप्प्यातील राजनिहाय मतदारसंघ
अरुणाचल प्रदेश २, आसाम ५, बिहार ४, छत्तीसगड १, मध्य प्रदेश ६
महाराष्ट्र ५, मणिपूर २, मेघालय २, मिझोराम १, नागालँड १, राजस्थान १२, सिक्कीम १, तामिळनाडू ३९ उत्तर प्रदेश ८, उत्तराखंड ५, पश्चिम बंगाल ३, अंदमान-निकोबार, जम्मू-काश्मीर १, लक्षद्वीप १, पुदुचेरी १.

राज्यातील या मतदार संघांचा समावेश
नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.

रिंगणात आठ मंत्री -  नितीन गडकरी, किरेन रिजिजू, सर्वांनंद सोनोवाल, संजीव बलियान, जितेंद्र सिंह, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल, एल. मुरुगन

दोन माजी मुख्यमंत्री : बिप्लव कुमार देब (त्रिपुरा), नबाम तुकी (अरुणाचल प्रदेश) माजी राज्यपाल - टी. सौंदरराजन

प्रमुख नेत्यांच्या राज्यातील सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी :    चंद्रपूर व कन्हान, 
गृहमंत्री अमित शाह : साकोली (भंडारा), 
राहुल गांधी :    साकोली (भंडारा), मल्लिकार्जुन खरगे : नागपूर
एकनाथ शिंदे : काटोल, सावनेर, उमेरड
देवेंद्र फडणवीस : पाचही मतदारसंघ
योगी आदित्यनाथ : नागपूर, भंडारा
मायावती : नागपूर
कन्हैया कुमार : रामटेक, चंद्रपूर
अभिनेते गोविंदा : रामटेक

Web Title: Lok Sabha Elections 2024 first phase of the campaign has died down Voting tomorrow for 5 seats in Maharashtra, 102 seats in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.