तामिळनाडूत मिळू शकतात एनडीएला जास्तीत जास्त सात जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 11:01 IST2024-06-02T11:00:54+5:302024-06-02T11:01:25+5:30
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने एनडीएला दोन ते चार जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

तामिळनाडूत मिळू शकतात एनडीएला जास्तीत जास्त सात जागा
नवी दिल्ली : एनडीएला तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त सात जागा मिळू शकतात, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या अंदाजानुसार, एनडीएला पाच ते सात जागा मिळतील. इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने एनडीएला दोन ते चार जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.
जन की बात एक्झिट पोलने एनडीएला पाच जागा दिल्या आहेत. तीन अन्य एक्झिट पोल एबीपी न्यूज सी वोटर, इंडिया न्यूज-डी डायनॅमिक आणि टीव्ही ९ भारतवर्षच्या अंदाजानुसार, एनडीएला या राज्यात किमान एक जागा मिळेल. न्यूज नेशनने एनडीएला दोन आणि रिपब्लिक भारत-मॅट्रिझने फक्त एक जागा दिली आहे.