पक्षाने उमेदवारी नाकारली, धक्का बसल्याने केलं विषप्राशन, तामिळनाडूतील ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 02:22 PM2024-03-28T14:22:29+5:302024-03-28T14:23:57+5:30

Tamil Nadu Lok Sabha Election : पक्षाने लोकसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्याने धक्का बसल्याने तामिळनाडूमधील एमडीएमकेचे खासदार ए. गणेशमूर्ती यांनी विषप्राशन केले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गणेशमूर्ती यांचं आज रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे.

Lok Sabha Election 2024: Party rejects candidature, shock commits poisoning, death of MDMK senior leader A Ganeshamurthi in Tamil Nadu | पक्षाने उमेदवारी नाकारली, धक्का बसल्याने केलं विषप्राशन, तामिळनाडूतील ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू 

पक्षाने उमेदवारी नाकारली, धक्का बसल्याने केलं विषप्राशन, तामिळनाडूतील ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू 

पक्षाने लोकसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्याने धक्का बसल्याने तामिळनाडूमधील एमडीएमकेचे खासदार ए. गणेशमूर्ती यांनी विषप्राशन केले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गणेशमूर्ती यांचं आज रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. पक्षाने लोकसभा उमेदवारी नाकारल्यानंतर गणेशमूर्ती हे खूप तणावाखाली होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

ए. गणेशमूर्ती यांनी २४ मार्च रोजी त्यांच्या इरोड येथील निवासस्थानी कथितपणे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती.  मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गणेशमूर्ती हे तीन वेळा निवडून आले होते. मात्र यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून ते तणावाखाली होते.

अविनाशी गणेशमूर्ती यांचा जन्म १० जून १९४७ रोजी झाला होता. ते तामिळनाडूमधील एमडीएमके पक्षाचे खासदार होते. त्यांनी इरोड मतदारसंघातून २००९ आणि २०१९ मध्ये निवडून आले होते. तर १९९८ मध्ये ते पलानी येथून निवडून आले होते. 

इरोड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेल्या ए. गणेशमूर्ती यांनी २४ मार्च रोजी विषप्राशन करून  जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची प्रकृती बिघडल्यावर कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज पहाटे पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. गणेशमूर्ती हे ७७ वर्षांचे होते. गणेशमूर्ती यांच्या मृत्यूमुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी एमडीएमकेला मोठा धक्का बसला आहे.   

Web Title: Lok Sabha Election 2024: Party rejects candidature, shock commits poisoning, death of MDMK senior leader A Ganeshamurthi in Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.