Rakesh Tikait : INDIA की NDA... कोणाला समर्थन देणार?; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 08:42 AM2024-04-13T08:42:00+5:302024-04-13T08:47:06+5:30

Lok Sabha Election 2024 And Rakesh Tikait : शेतकरी आंदोलनाचे नेते असलेले राकेश टिकैत यावेळी कोणाला पाठिंबा देत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Lok Sabha Election 2024 farmer leader Rakesh Tikait not support india or nda alliance in voting | Rakesh Tikait : INDIA की NDA... कोणाला समर्थन देणार?; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोठी घोषणा

Rakesh Tikait : INDIA की NDA... कोणाला समर्थन देणार?; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. याच दरम्यान, यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांना आकर्षित करून आपल्या बाजूने आणण्याची एकही संधी सोडायची नाही. मात्र शेतकरी आंदोलनाचे नेते असलेले राकेश टिकैत यावेळी कोणाला पाठिंबा देत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी गुरुवारी बिहारच्या चौसा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, आम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा देणार नाही आणि एनडीएचंही समर्थन करणार नाही. ज्याला जिथे मतदान करावसं वाटेल तो तिथे मतदान करू शकतो. आमच्या आंदोलनाला दोन्ही बाजूंनी पाठिंबा मिळाला आहे असं शेतकरी नेत्याने म्हटलं आहे. 

जे सरकार शेतकरी विरोधी काम करेल त्याला आमचा विरोध असेल असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं की, बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील बनारपूर चौसा गावात लाठीचार्ज करून जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटलो, ही लढाई अधिक ताकदीने लढावी लागणार आहे 

आता पहिल्या टप्प्यातील मतदानाला एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांची ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. राकेश टिकैत यांच्या या  विधानामुळे आता विरोधकांच्याही आशा पल्लवीत होताना दिसत आहेत. टिकैत कुटुंबाचा पश्चिम उत्तर प्रदेशात बराच प्रभाव असल्याचे मानलं जातं. त्यांचं घर उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघात येतं.
 

Web Title: Lok Sabha Election 2024 farmer leader Rakesh Tikait not support india or nda alliance in voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.