Coronavirus: डॉक्टरांची ड्युटीला दांडी; ऑक्सिजन पातळी खालावल्याने तडफडून १२ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 01:41 PM2021-06-30T13:41:10+5:302021-06-30T13:44:01+5:30

Coronavirus: मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर डॉक्टर नसल्यामुळे १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

in last 24 hours 12 corona deaths at guwahati gmch hospital assam | Coronavirus: डॉक्टरांची ड्युटीला दांडी; ऑक्सिजन पातळी खालावल्याने तडफडून १२ रुग्णांचा मृत्यू

Coronavirus: डॉक्टरांची ड्युटीला दांडी; ऑक्सिजन पातळी खालावल्याने तडफडून १२ रुग्णांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या २४ तासांत १२ कोरोनाबाधितांचा मृत्यूडॉक्टर ड्युटीवर गैरहजर राहिल्याचा आरोपहॉस्पिटलचे अधिष्ठाता सरमा यांची सारवासारव

गुवाहाटी: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतर सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. नवीन कोरोनाबाधित आणि मृत्यू यांचे कमी होणारे प्रमाण दिलासादायक आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी केवळ निष्काळजीपणामुळे अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक घटना आसाममधील गुवाहाटीमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर डॉक्टर नसल्यामुळे १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. (in last 24 hours 12 corona deaths at guwahati gmch hospital assam)

जीएमसीएचचे डीन अभिजित सरमा यांनी सांगितले की, कोरोनाबाधित १२ रुग्णांपैकी ९ रुग्ण आयसीयूमध्ये होते, तर तीन रुग्ण कोव्हिड वॉर्डमध्ये होते. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. मात्र, अन्य माहितीनुसार, या रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावत गेली, तेव्हा डॉक्टर ड्युटीवर उपस्थित नव्हते. 

“जा आणि मरा, हवं ते करा”; पालकांच्या तक्रारीवर भाजपच्या शिक्षणमंत्र्यांचं उत्तर

आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, रात्रपाळीला अनेकदा डॉक्टर ड्युटीवर येतच नाहीत. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच आसामचे आरोग्यमंत्री केशव महंत यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. याप्रकरणी वरिष्ठ डॉक्टरांची एक बैठक बोलावण्यात आली. 

सरमांची सारवासारव

या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यात उशीर झाला होता. या रुग्णांना दाखल करून घेण्यात आले, तेव्हाच त्यांची ऑक्सिजन पातळी प्रमाणापेक्षा अधिक कमी झाली होती. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. ऑक्सिजन सपोर्ट देऊनही त्यांची ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. तसेच काही रुग्णांना एकापेक्षा अधिक व्याधी झालेल्या होत्या. याशिवाय यापैकी कुणीही कोरोनाचा एकही डोस घेतला नव्हता, अशी सारवासारव सरमा यांनी केली आहे. 

कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे

दरम्यान, आसाममध्ये उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार ०४३ वर गेली असून, कोरोनाचा संसर्ग दर २.०१ टक्के आहे. तसेच आसाममध्ये कोरोना मृत्यूदर ०.८९ टक्के असून, रिकव्हरी रेट ९३.८७ टक्के असल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: in last 24 hours 12 corona deaths at guwahati gmch hospital assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.