kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency | राहुल गांधींना धक्का! वायनाडमध्येच काँग्रेसला गळती; ४ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

राहुल गांधींना धक्का! वायनाडमध्येच काँग्रेसला गळती; ४ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

ठळक मुद्देवायनाडमधून काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा राजीनामाराहुल गांधींना मोठा धक्का असल्याची राजकीय वर्तुळात चर्चापक्षाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा नेते, पदाधिकाऱ्यांचा दावा

कोची : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम आणि केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Kerala Assembly Election 2021) राजकीय रणधुमाळी अधिक आक्रमक होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि वायनाड येथून खासदार असलेले राहुल गांधी (Rahul Gandhi) केरळ दौऱ्यावर होते. मात्र, राहुल गांधी यांच्या मतदारसंघातच काँग्रेसला धक्का बसला असून, प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केल्याची माहिती मिळाली आहे. (kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency)

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यावेळी वायनाड मतदारसंघाने राहुल गांधी यांना पाठिंबा देत मोठ्या मतांनी विजयी केले होते. काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाड मतदारसंघामधून चार प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. राहुल गांधींसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. 

राहुल गांधींना RSS समजून घ्यायला बराच वेळ लागेल; प्रकाश जावेडकरांचा टोला

राहुल गांधींना मोठा धक्का

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांमध्ये केरळचे प्रदेश काँग्रेस समिती सचिव एम. एस. विश्वनाथन, महिला काँग्रेस राज्य सचिव सुजया वेणुगोपाल, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे सरचिटणीस पी. के. अनिल कुमार आणि केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य के. के. विश्वनाथन यांचा समावेश आहे. या नेत्यांनी काँग्रेसविरोधी माकपमध्ये जाण्याचे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे भावी पक्षाध्यक्ष आणि काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जाणारे राहुल गांधी यांच्यासाठी वायनाडमध्ये हा मोठा फटका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे समजते. 

पक्षाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा

वाडनाड जिल्ह्यात काँग्रेस नेतृत्व सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच नेते, पदाधिकाऱ्यांकडे पक्षाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असे प्रदेश काँग्रेस समिती सचिव एम. एस. विश्वनाथन यांनी सांगितले. तर, वाडनाडमध्ये केवळ तीन जणच पक्ष चालवत आहेत. बाकीच्या सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना किंमत दिली जात नाही, असा आरोप प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य के. के. विश्वनाथन यांनी केला आहे. 

दरम्यान, माकपचे नेते इ. ए. शंकरन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आदिवासी क्षेमा समितीचे ते राज्य सचिव असल्यामुळे मोठी व्होटबँक काँग्रेसच्या पाठिशी उभी राहू शकते, असे म्हटले जात आहे. केरळमध्ये ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात होणाऱ्या या मतदानाची मतमोजणी मात्र थेट २ मे रोजी होणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.