अपक्षांमुळे बिघडणार गणित?; बिहारच्या 3 महत्त्वाच्या मतदारसंघांमधील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 05:44 AM2024-04-12T05:44:32+5:302024-04-12T05:45:02+5:30

बिहारच्या पूर्णिया, काराकाट, महाराजगंज, नवादा मतदारसंघांमधील चित्र

Independents will make math worse?; A snapshot of 3 important constituencies of Bihar | अपक्षांमुळे बिघडणार गणित?; बिहारच्या 3 महत्त्वाच्या मतदारसंघांमधील चित्र

अपक्षांमुळे बिघडणार गणित?; बिहारच्या 3 महत्त्वाच्या मतदारसंघांमधील चित्र

एस.पी. सिन्हा

पाटणा : बिहारमध्ये लोकसभा निवडणुकांत अपक्ष हे राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या मार्गातले काटे बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्णिया, काराकाट, महाराजगंज, नवादा आदी मतदारसंघांमध्ये हे चित्र दिसू शकते असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पूर्णिया मतदारसंघात बंडखोर उमेदवार पप्पू यादव हे राजदच्या उमेदवार बीमा भारती यांच्या विजयाची शक्यता कमी करू शकतात.

काराकाट लोकसभा मतदारसंघात भोजपुरी अभिनेता पवन सिंह हे निवडणूक रिंगणात उतरल्याने एनडीएच्या गोटात अस्वस्थता आहे. काराकाटमध्ये एनडीएचे उमेदवार व राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्याविरोधात इंडिया आघाडीतर्फे राजारामसिंह हे लढत देत आहेत. नवादा लोकसभा मतदारसंघात राजदच्या दोन आमदारांनी पक्षाचे उमेदवार श्रवण कुशवाह यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार विनोद यादव यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. भोजपुरी अभिनेता विनोज यादव हेही अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून त्यामुळे राजदची चिंता वाढली आहे. 
महाराजगंज मतदारसंघात भाजप व काँग्रेस यांच्यातच चुरशीची लढत होईल. भाजपतर्फे जनार्दनसिंह सिग्रीवाल हे उमेदवार असून काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. विधान परिषदेचे सदस्य सच्चिदानंद राय या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यामुळे भाजप, काँग्रेस हे दोन्ही पक्ष चिंताग्रस्त झाले आहेत.

तिकीट वाटपावरुन लालुंच्या पक्षामध्ये नाराजी
लाेकसभेचे मतदान काही दिवसांवरच येऊन ठेपले आहे. राजकीय पक्षांनी पहिल्या दाेन टप्प्यांसाठी तिकीटवाटप जाहीर केले आहे. बिहारमध्ये लालुप्रसाद यादव यांच्या राजदला २३ जागा मिळाल्या आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या तिकीटवाटपावरुन पक्षात नाराजी दिसत आहे. त्याचा किती फायदा महाआघाडीला हाेताे, यावर पक्षाचे नेतेच प्रश्नचिन्ह उपस्थित करु लागले आहेत.
कटिहारमध्ये माजी राज्यसभा सदस्य अशफाक करिम यांना लाेकसभेची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. त्याचवेळी पूर्णियामधून बंडखाेरी करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पप्पू यादव यांच्याविराेधात राजदने उमेदवार उभा केला आहे. यावरुनही अशफाक यांनी लालुंवर टीका केली आहे.

लालूंच्या खेळीचा एनडीएला फायदा?
nबिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या प्रभावाखाली झालेल्या जागावाटपाचा फायदा महाआघाडीपेक्षा एनडीएला होत असल्याचे दिसते. भागलपूरची जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे, परंतु १९८४ पासून काँग्रेसला ही जागा जिंकता आलेली नाही.
nऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निखिल कुमार हे काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपचे उमेदवार सुशील सिंह यांना कडवी टक्कर देऊ शकतात. पण आरजेडीने ही जागा आपल्याकडे घेऊन कमकुवत उमेदवार उभा केला. पूर्णियातून पप्पू यादव यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही.
nनवाडा येथेही आरजेडीने श्रावण कुशवाह यांना उमेदवारी दिली. परंतु त्यांचा आमदारकी आणि विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला होता.

Web Title: Independents will make math worse?; A snapshot of 3 important constituencies of Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.