Haridwar: बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या शौर्य यात्रेवर दगडफेक, कार्यकर्त्यांचा रस्त्यावर गोंधळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:24 IST2025-12-08T12:22:19+5:302025-12-08T12:24:21+5:30
Stone-pelting on Bajrang Dal: बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या शौर्य यात्रेवर दगडफेक करण्यात आला, असा आरोप करत त्यांच्या कार्यकर्त्यांनी निर्दशने केली.

Haridwar: बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या शौर्य यात्रेवर दगडफेक, कार्यकर्त्यांचा रस्त्यावर गोंधळ!
हरिद्वारमधील आर्यनगर चौकात रविवारी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. 'शौर्य दिना'निमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीदरम्यान त्यांच्यावर दगडफेक आणि ज्वलनशील पदार्थांनी हल्ला झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे रस्त्यावर मोठा जमाव जमला. मात्र, पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
STORY | Stone-pelting on Bajrang Dal's procession in Haridwar; heavy police force deployed
— Press Trust of India (@PTI_News) December 7, 2025
The atmosphere became tense in the Jwalapur area of Haridwar in Uttarakhand on Sunday when a procession being taken out by the Bajrang Dal was allegedly pelted with stones, officials… pic.twitter.com/HQi3yb91mJ
कार्यकर्त्यांचा आरोप काय?
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, दुर्गा चौकात काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. तसेच, पेट्रोल बॉम्बसारखे ज्वलनशील पदार्थ फेकले. रविवारी संध्याकाळी बजरंग दलाची मिरवणूक आर्यनगर चौकात पोहोचताच संतप्त कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि दगडफेकीचा आरोप करत निदर्शने केली.
पोलीस घटनास्थळी दाखल
याबाबत माहिती मिळताच एसपी सिटी अभय प्रताप सिंह आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त जमावाला शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना संध्याकाळपर्यंत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर निदर्शक शांत झाले. बजरंग दलाचे नेते अमित मुल्तानिया यांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध दगडफेक आणि ज्वलनशील पदार्थांनी हल्ला केल्याचा आरोप करत पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
गुन्हा दाखल
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आम्ही या आरोपांची गांभीर्याने चौकशी करत आहोत. आरोप खरे ठरल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल." या घटनेमुळे हरिद्वारमध्ये तणाव निर्माण झाला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त लावला आहे.