Gandhinagar Lok Sabha election results: gujarat counting of votes on gandhinagar lok sabha seat bjp president amit shah leading in trends | गांधीनगर लोकसभा निवडणूक निकाल: अमित शाहांनी तोडला लालकृष्ण अडवाणींचा रेकॉर्ड

गांधीनगर लोकसभा निवडणूक निकाल: अमित शाहांनी तोडला लालकृष्ण अडवाणींचा रेकॉर्ड

गांधीनगर: गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून अमित शाहांनी मोठं मताधिक्क्य घेत आघाडी मिळवली आहे. भारतातल्या राजकारणातील आधुनिक चाणक्य म्हणून ओळख असलेल्या अमित शाहांनी लालकृष्ण अडवाणींचाही रेकॉर्ड तोडला आहे. सध्याच्या कलानुसार गांधीनगर मतदारसंघातून अमित शाह 5 लाखांहून अधिक मतांनी पुढे आहेत. त्यांनी अडवाणींचा 4.83 लाख मतदानाचा रेकॉर्ड तोडला आहे. शाह यांच्याविरोधात काँग्रेसनं डॉक्टर सी. जे. चावडा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं.

अमित शाह पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना लालकृष्ण अडवाणींच्या जागी गांधीनगरमधून निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं आहे. गांधीनगर हा भाजपाचा अभेद्य किल्ला राहिला आहे. तिथून भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी खासदार होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या गांधीनगर जागेवरून भाजपाला नेहमीच विजयाची खात्री राहिली आहे. पक्षानं 1989पासून लागोपाठ या जागेवरून विजय मिळवला आहे. गांधीनगर जागेवरून 1967मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली. यात काँग्रेसचा विजय झाला होता. त्यानंतर वर्ष 1971मध्ये काँग्रेस, 1977च्या निवडणुकीत जनता दल आणि 1980च्या निवडणुकीत काँग्रेसनं विजय संपादन केला होता.


वर्षं 1989च्या निवडणुकीत भाजपा नेते आणि राज्यात मुख्यमंत्री राहिलेल्या शंकर सिंह वाघेला यांनी गांधीनगर जागेवर कब्जा केला. तेव्हापासून या मतदारसंघात भगवाच फडकला आहे. वर्ष 1991मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि 1996मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी विजय मिळवला होता. त्यानंतर 1998पासून आतापर्यंत लालकृष्ण अडवाणींनी या जागेचं प्रतिनिधित्व केलं आहे. भाजपानं आता त्यांच्या जागी अमित शाह यांना उमेदवारी दिली आहे आणि शहा विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gandhinagar Lok Sabha election results: gujarat counting of votes on gandhinagar lok sabha seat bjp president amit shah leading in trends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.