कोलकातामध्ये ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; रहिवाशांमध्ये घबराट, घरे आणि कार्यालये रिकामी करून लोक रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:03 IST2026-02-27T13:57:27+5:302026-02-27T14:03:52+5:30

कोलकातामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, त्यामुळे घराबाहेर पडून रस्त्यावर आलेल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Earthquake of magnitude 5.0 in Kolkata; panic among residents, people evacuate homes and offices, take to the streets | कोलकातामध्ये ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; रहिवाशांमध्ये घबराट, घरे आणि कार्यालये रिकामी करून लोक रस्त्यावर

कोलकातामध्ये ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; रहिवाशांमध्ये घबराट, घरे आणि कार्यालये रिकामी करून लोक रस्त्यावर

कोलकातामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता इतकी तीव्र होती की लोक घरे आणि कार्यालये सोडून रस्त्यावर आले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.० इतकी होती. शुक्रवारी, २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १.२२ वाजता भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र भारत-बांगलादेश सीमेजवळ बांगलादेशच्या आत ३ किलोमीटर अंतरावर होते.

सिक्कीमलाही भूकंपाचा धक्का

आज पहाटे ४.१० वाजता सिक्कीममध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.७ इतकी होती.

भूकंपामुळे पश्चिम सिक्कीममधील दोन शाळांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. ताशिडिंगमधील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आणि गेरेथांग ज्युनियर हायस्कूलचे छतही कोसळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

या आधी कालच राज्यात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले होते. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीती आहे.

Web Title : कोलकाता में 5.0 तीव्रता का भूकंप; सिक्किम में भी झटके महसूस

Web Summary : कोलकाता में 5.0 तीव्रता का भूकंप आया, जिससे दहशत फैल गई। सिक्किम में भी झटके महसूस हुए, जिससे स्कूल की इमारतों को नुकसान पहुंचा। किसी के हताहत होने की खबर नहीं है; अधिकारी स्थिति पर नजर रख रहे हैं। कल भी भूकंप आया था।

Web Title : Kolkata Hit by 5.0 Magnitude Earthquake; Tremors Felt in Sikkim

Web Summary : Kolkata experienced a 5.0 magnitude earthquake, triggering panic. Sikkim also felt tremors, causing damage to school buildings. No casualties were reported; authorities are monitoring the situation. This follows another quake yesterday.