आधी होता काँग्रेसचा मित्र, आता विरोधात उतरला; जनता दलाच्या अस्तित्वाची निवडणूक

By वसंत भोसले | Published: April 18, 2024 05:53 AM2024-04-18T05:53:15+5:302024-04-18T05:53:30+5:30

मागील निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जनता दलासाठी सोडली होती.

Earlier he was a friend of Congress, now he came against it Election of existence of Janata Dal | आधी होता काँग्रेसचा मित्र, आता विरोधात उतरला; जनता दलाच्या अस्तित्वाची निवडणूक

आधी होता काँग्रेसचा मित्र, आता विरोधात उतरला; जनता दलाच्या अस्तित्वाची निवडणूक

डॉ. वसंत भोसले, लोकमत न्यूज नेटवर्क
बंगळुरू
: कावेरी खोऱ्यातील सर्वात सुपीक प्रदेश असलेल्या मंड्या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमार स्वामी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेस पक्षातर्फे व्यंकटरमणे गौडा प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. जनता दलाच्या अस्तित्वाची ही 
निवडणूक  आहे.
            
मागील निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जनता दलासाठी सोडली होती. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंडया लोकसभा मतदारसंघातील आठपैकी सहा जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. जनता दलास एकच जागा मिळाली होती. तर सर्वोदय कर्नाटक पक्षाने एका जागेवर विजय नोंदवला होता. कावेरी पाणी वाटपाबाबतची भूमिका येथे महत्त्वाची ठरत आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- वोक्कलीगा समाजातील फूट.
- लिंगायत समाजाचा पाठिंबा.            
- पर्जन्यमाने कमी झाल्याने निर्माण झालेली पाणीटंचाई.
- दुष्काळसदृश परिस्थिती 
- हाताळण्यासाठी मदत.
- जनता दल -भाजप आघाडी असली तरी कार्यकर्ते एकत्र येणार का ?
- विधानसभा निवडणुकीतील यश टिकवून ठेवण्याचे काँग्रेससमोर आव्हान

Web Title: Earlier he was a friend of Congress, now he came against it Election of existence of Janata Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.