"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:46 IST2025-12-26T11:45:54+5:302025-12-26T11:46:50+5:30
"नक्कीच मुंबई पोलीस दलातला आहे. हा शिंदेचा फार जवळचा आहे. हा शिंद्यांचा अत्यंत जवळचा आहे. शिंद्यांचा शार्प शूटर आहे तो...!"

"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
सातारा मधल्या ड्रगच्या कारखान्याच काय झालं? हे सांगतील का देवेंद्र फडणवीस? त्यातले खरे सूत्रधार कोण आहेत? हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर गुडघ्यावर बसले जवळजवळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रगच्या कारखान्याच्या सूत्रधारांना अभय दिल. एकनाथ शिंदे यांच्याच भावाची आहे ना ती जागा? त्यांना माहित नाही? मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे, त्या ड्रगच्या कारखान्याशी आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे. नाव घेईन लवकरच. असा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. एढेच नाही तर, "महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नशेबाज राजकारण झाले आहे. नशेच्या व्यापारातून आलेला पैसासुद्धा राजकारणात वापरला जातोय," असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.
राऊत म्हणाले, "महाड मधल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे, तो कुठे आहे, हे मी सांगतो हवं तर पोलिसांना. काय चाललं या राज्यामध्ये? या युत्या-बित्या आघाड्या होत असतील हो, म्हणून भारतीय जनता पक्षाचा सर्व पातळीवरती पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षातले संबंधित लोक आम्हाला मदत करत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू."
राज्याचे राजकारण नशेबाज झालंय -
आपण एक महत्वाचा उल्लेख केला की, या ड्रग प्रकरणात मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचा समावेश हा अधिकारी कोण आहे? असे विचारले अशता राऊत म्हणाले, "हे मी सांगण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांनी सांगावं. त्यांच्यापर्यंत सर्व माहिती आली आहे. काय लपवतायत तुम्ही? कोणाला पाठीशी घालतायत? एकनाथ शिंद्यां, त्यांच्या मुलाला की त्यांच्या टोळीला? हे टोळ्या चालवतायत आणि अशा अनेक मार्गान पैसे गोळा करून राजकारणामध्ये आणत आहेत. महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नशेबाज राजकारण झाले आहे. नशेच्या व्यापारातून आलेला पैसासुद्धा राजकारणात वापरला जातोय. प्रकरण थंड कसं पडलं? एवढं गंभीर प्रकरण, छत्रपतींच्या भूमीमध्ये साताऱ्यात एक खतरनाक ड्रगचा कारखाना सापडतो. मुंबईचे पोलीस जाऊन त्याच्यावरती रेड टाकतात. साताऱ्याचे नाही, सातारच्या पोलीस अधीक्षकाने वाचवायचा प्रयत्न केला. मुंबईचे पोलीस जाऊन तिथे रेड करतात. मग त्या पोलिसांच्या तपासात अडथळे आणले जातात गृह खात्याकडून. उपमुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेकडून आणि हे प्रकरण हातापाया जाते म्हटल्यावरती संबंधित मंत्री हे गृहमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जातात वाचवण्यासाठी आणि प्रकरण थंड केल जात.
'तो' शिंद्यांचा अत्यंत जवळचा... शार्प शूटर... -
यावर, हा जो माजी पोलीस अधिकारी आहे, हा मुंबई पोलीस दलातला आहे की बाहेरचा आहे? असे विचारले असता, "नक्कीच मुंबई पोलीस दलातला आहे. हा शिंदेचा फार जवळचा आहे. हा शिंद्यांचा अत्यंत जवळचा आहे. शिंद्यांचा शार्प शूटर आहे तो. महाराष्ट्राच्या तरुणांना नशेबाज केलं जातय आणि त्यातून राजकारणात हा पैसा ओतून हे हिंदुत्ववादी आम्हाला हिंदुत्व शिकवतात ढोंगी," असा गंभीर दावाही राऊतांनी यावेळी केला.