Divyanshi's record of getting 600 marks out of 600 in CBSC exam | सीबीएससी परीक्षेत 600 पैकी 600 गुण मिळवत दिव्यांशीने रचला विक्रम

सीबीएससी परीक्षेत 600 पैकी 600 गुण मिळवत दिव्यांशीने रचला विक्रम

ठळक मुद्दे सीबीएससीच्या बोर्ड परीक्षेत असं ऐतिहासिक यश मिळेल, पैकीच्या पैकी मार्क मिळतील, असे स्वप्नातही वाटलं नव्हतं.

लखनौ - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईचे निकाल 15 जुलैपूर्वी जाहीर होऊ शकतात अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी (13 जुलै) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये लखनौची कन्या दिव्यांश जैन हिने 600 पैकी 600 गुण मिळवत इतिहास रचला आहे. नवयुग रेसिडेन्सची विद्यार्थीनी असलेल्या दिव्यांशीच्या या दैपिप्यमान यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सीबीएससीच्या बोर्ड परीक्षेत असं ऐतिहासिक यश मिळेल, पैकीच्या पैकी मार्क मिळतील, असे स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र, मी वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास केला होता. सातत्याने मी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं होतं, विशेष म्हणजे मी स्वअभ्यासाला प्राधान्य दिलं, रिव्हीजनही केलं होतं, असे दिव्यांशीने म्हटले आहे. दिव्यांशीचे वडिल राकेश जैन यांचे लखनौमध्ये दुकान असून आई सीमा जैन या गृहिणी आहेत. दिव्यांशीला हायस्कुलमध्ये 97.6 टक्के गुण मिळाले आहेत. 

cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. 

दिव्यांशी जैन चे प्रगती पुस्तक  

इंग्लिश- 100
संस्कृत- 100
इतिहास- 100
भूगोल- 100
इश्योरेंस- 100
इकोनॉमिक्स- 100

निकाल पाहण्यासाठी हे फॉलो करा....

 सर्वप्रथम निकाल पाहण्यासाठी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in वर जा.

- वेबसाईटवर देण्यात आलेल्या बारावी निकाल या लिंकवर क्लिक करा.

- आपला रोल नंबर टाका आणि आवश्यक ती माहिती द्या 

- निकाल पाहता येईल. डाऊनलोड करता येईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Divyanshi's record of getting 600 marks out of 600 in CBSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.