अजबच! म्हशीच्या शेणामुळे मालकाला तब्बल १० हजारांचा दंड; मध्य प्रदेशातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 15:01 IST2020-12-30T14:54:45+5:302020-12-30T15:01:03+5:30
एक अजब घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. रस्त्यावर पडलेल्या शेणामुळे थेट म्हशीच्या मालकाला तब्बल १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे समोर आले आहे.

अजबच! म्हशीच्या शेणामुळे मालकाला तब्बल १० हजारांचा दंड; मध्य प्रदेशातील घटना
ग्वाल्हेर : भारतात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. अशीच एक अजब घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. रस्त्यावर पडलेल्या शेणामुळे थेट म्हशीच्या मालकाला तब्बल १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे समोर आले आहे. ग्वाल्हेर महानगरपालिकेकडून हा दंड करण्यात आला आहे.
ग्वाल्हेर महानगरपालिकेकडून ठोठावण्यात आलेल्या दंडाची रिसीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. ग्वालियर महानगरपालिकेकडून एका नवीन रस्त्याचं काम सुरू होते. त्यावेळी बेताल सिंग नामक डेअरी मालकाच्या एका म्हशीने रस्त्यावर घाण केली. नेमक्या याचवेळी रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे आयुक्त तिथे पोहोचले. नव्या रस्त्यावर म्हशीचे शेण पडल्याचे दिसले आणि म्हशीच्या मालकाला दंड ठोठावण्याचा आदेश दिला.
ग्वालियर नगर निगम ने सड़क पर भैंसों द्वारा गोबर करने के चलते एक डेयरी संचालक पर 10,000 रुपये का जुर्माना लगाया।
— ANI_HindiNews (@AHindinews) December 28, 2020
क्षेत्राधिकारी नगर निगम मनीष कन्नौजिया ने बताया,"उनकी भैसें सड़क पर घूम रही थी, समझाने पर भी वो नहीं समझे। हमें कार्रवाई के निर्देश मिले, जिसके बाद जुर्माना लगाया गया" pic.twitter.com/NoKG7O0naP
यासंदर्भात बोलतना ग्वालियर महानगरपालिकेचे अधिकारी मनीष कनोजिया यांनी सांगितले की, ग्वाल्हेर शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे काम सुरू आहेत. रस्त्यावर आणि शहरातील इतर ठिकाणी कचरा होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. रस्त्यावर टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करत त्यांना दंड ठोठावला जात आहे. तसेच स्वच्छतेबाबतही जागरुकता करण्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असताना बेताल सिंगच्या म्हशी रस्त्यावर फिरत होत्या. त्यांना सांगूनही त्याने म्हशींना हटवले नाही. आयुक्तांच्या आढावा दौऱ्यावेळी म्हशीचे शेण आढळून आले. तेव्हा बेताल सिंगविरोधात कारवाई करत १० हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले. डेअरी मालकानेही चूक मान्य केली असून, महापालिकेच्या कार्यालयात दंड भरला आहे, असे माहिती मिळाली आहे.