केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:53 IST2024-11-30T16:53:07+5:302024-11-30T16:53:29+5:30

Congress News:  काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची मागणी करत त्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Congress will raise its voice against not only EVMs but the entire election process | केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज

केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज

 काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची मागणी करत त्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या बैठकीत पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावरही टीका करण्यात आली आहे. तसेच हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातील निवड़णुकीतील कामगिरीची चौकशी करण्यासाठी एका अंतर्गत समितीची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

या बैठकीच्या प्रस्तावामध्ये इव्हीएमच्या मुद्द्यावर मौन बाळगण्यात आलं. हरयाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यसमितीच्या बैठकीमध्ये  काँग्रेसने इव्हीएम किंवा पुन्हा मतपत्रिकांद्वारे मतदानाच्या मुद्द्यावर अडून न राहण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी आपल्या आंदोलनामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच आवाज उठवण्याचं निश्चित केलं. मात्र काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणुकीमध्ये मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची मागणी केली होती.  

सुमारे साडेचार तास चाललेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकांमधील गैरव्यवहाराबाबत पक्ष सर्व स्तरांवर लक्ष केंद्रित करेल, असं निश्चित करण्यात आलं. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निकालांनंतर विरोधी पक्षांकडून इव्हीएमवर खापर फोडण्यात येत असलं तरी हे पराभवासाठी इव्हीएमला दोष देणं समजुतदारपणा नसल्याचं काँग्रेसच्या एका वर्गाचं म्हणणं आहे. इव्हीएमवरील आरोप सिद्ध करण्यासाठी कुठलेही ठोस पुरावे नसल्यानं तसं करणं योग्य ठरणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पक्षाने व्यापक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावं, असं निश्चित करण्यात आलं. तसेच बैठकीच्या अखेरीस पारित करण्यात आलेल्या ठरावामध्ये इव्हीएमचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.  

Web Title: Congress will raise its voice against not only EVMs but the entire election process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.