ईदच्या जुलूसमध्ये गोंधळ, पोलिसांनी लाठीचार्ज करुन हाताळली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 08:20 PM2021-10-19T20:20:29+5:302021-10-19T20:22:36+5:30

ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी उटावद दरवाजा परिसरात पोलिसांनी काही ठिकाणी बॅरिकेट्स लावून प्रवेश निषिद्ध असे बोर्ड लावले होते.

Chaos in Eid procession, situation handled by MP dhar police charging batons in madhya pradesh | ईदच्या जुलूसमध्ये गोंधळ, पोलिसांनी लाठीचार्ज करुन हाताळली परिस्थिती

ईदच्या जुलूसमध्ये गोंधळ, पोलिसांनी लाठीचार्ज करुन हाताळली परिस्थिती

Next
ठळक मुद्देप्रशासनाने जुलूस काढण्यास परवानगी दिली नव्हती, सोमवारी काही नियम व अटींसह केवळ संबंधित परिसरातच हा जुलूस काढण्यास परवानगी देण्यात आली.

धार - मध्य प्रदेशच्या धार शहरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त जुलूस काढण्यात आला होता. येथील उटावद दरवाजा परीसरातून जात असताना या मिरवणुकीत काही प्रमाणात गोंधळ झाला. या जुलूसमधील लोकांनी पोलिसांनी लावलेले बॅरीकेट्स हटवून प्रवेश नसलेल्या ठिकाणात प्रवेश केला. त्यावेळी, समजावून सांगूनही न ऐकल्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर लाठीचार्ज केला. 

ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी उटावद दरवाजा परिसरात पोलिसांनी काही ठिकाणी बॅरिकेट्स लावून प्रवेश निषिद्ध असे बोर्ड लावले होते. मात्र, जुलूसमधील काहीजणांना बॅरिकेट हटवून पोलिसांना न जुमानता संबंधित परिसरात प्रवेश केला. त्यामुळे, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्रशासनाने जुलूस काढण्यास परवानगी दिली नव्हती, सोमवारी काही नियम व अटींसह केवळ संबंधित परिसरातच हा जुलूस काढण्यास परवानगी देण्यात आली. त्यास, परवानगीशिवाय अनेक लोक एकत्र आल्याचे दिसून आले. त्यामुळे, मोहन टॉकीज इटावा दरवाजा परिसरात गोंधळलेली परिस्थिती लक्षात घेता, पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर शहरातील अनेक भागात लोकं एकत्र जमून गर्दी करत होते. दरम्यान, या जुलूसमध्ये जाणीपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. 
 

Web Title: Chaos in Eid procession, situation handled by MP dhar police charging batons in madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app