Breaking News : सुमित्रा महाजन यांनी केली लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:53 PM2019-04-05T13:53:12+5:302019-04-05T14:08:43+5:30

गेल्या काही दिवसांपासून इंदूरच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.

Breaking News: Sumitra Mahajan will not contest the Lok Sabha election from indore | Breaking News : सुमित्रा महाजन यांनी केली लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा

Breaking News : सुमित्रा महाजन यांनी केली लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा

Next

इंदूर - गेल्या काही दिवसांपासून इंदूरच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. ''मी आता लोकसभा निवडणूक लढवणार नाही. इंदूरमधील उमेदवारीबाबत आता पक्ष योग्य वाटेल तो निर्णय घेऊ शकतो, असे सुमित्रा महाजन यांनी प्रसारमाध्यमांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे. 

 75 वर्षांवरील नेत्यांना उमेदवारी न देण्याबाबत भाजपाकडून धोरण निश्चित करण्यात आले होते. या धोरणामुळे पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना यावेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही. तसेच पक्षाच्या इंदूरमधील दिग्गज नेत्या सुमित्रा महाजन यांच्या उमेदवारीबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. मावळत्या लोकसभेच्या अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन या इंदूर येथून सलग आठवेळ लोकसभेवर निवडून आल्या होत्या. तसेच 80 वर्षीय सुमित्रा महाजन यांची इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता असल्याने त्यांना उमेदवारी नाकारणे पक्षश्रेष्ठींना शक्य होत नव्हते.  अखेरीस सुमित्रा महाजन यांनीच निवडणूक न लढवण्याची घोणषा करून ही कोंडी फोडली. 


सलग आठवेळा इंदूरमधून निवडून आलेल्या सुमित्रा महाजन यांनी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले होते. तसेच 2014 मध्ये भाजपाची सत्ता आल्यावर लोकसभा अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. सुमित्रा महाजन या लोकसभेच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष ठरल्या होत्या. 
 

Web Title: Breaking News: Sumitra Mahajan will not contest the Lok Sabha election from indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.